स्टोरी

शासन शिवरायांच्‍या युद्धकलेचे संग्रहालय उभारणार! पर्यटनमंत्री, मंगलप्रभात लोढा

Spread the love

७ जून वार्ता: महाराष्‍ट्र शासनाच्‍या पर्यटन विभागाने गोराई येथील महाराष्‍ट्र पर्यटन विकास महामंडळाच्‍या १३६ भूमीवर छत्रपती शिवाजी महाराज यांच्‍या युद्धकलेचे संग्रहालय उभारण्‍याचा निर्णय घेतला आहे. या संग्रहालयासाठी शासनाकडून ५० कोटी रुपये इतका निधी दिला जाणार आहे, अशी माहिती पर्यटनमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी दिली.महाराष्‍ट्र पर्यटन विकास महामंडळाकडून याचे काम करण्‍यात येणार आहे. या संग्रहालयामध्‍ये शिवरायांच्‍या गनिमी काव्‍याच्‍या युद्धनीतीसह अन्‍य लढायांची माहिती दिली जाणार आहे. महाराजांच्‍या काळातील विविध गडदुर्गांची प्रामुख्‍याने सागरी गडांची प्रतिकृती आणि अन्‍य माहितीही इथे मिळणार आहे.


Spread the love

Related posts

मुणगेचे सुपुत्र प्रकाश लब्दे राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित!

news

७ नोव्हेंबर रोजी मसुरेत खुली ग्रुप डान्स आणि निमंत्रितांची एकेरी नृत्य स्पर्धा…

news

महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना मुख्य संघटक यश सरदेसाई यांचा सिंधुदुर्ग दौऱ्यास सावंतवाडीतुन सुरुवात.

news

Leave a Comment