स्टोरी

कोल्हापूर जिल्ह्यातील विशाळगडावर पशूहत्या करण्यास पुरातत्व विभागाची बंदी!

Spread the love

६ जून वार्ता: विशाळगडावर पशू-पक्षी यांची हत्या करून त्यांचे अन्न शिजवण्यास बंदी करावी, अशी मागणी गेली काही वर्षे विशाळगड रक्षण आणि अतिक्रमणविरोधी कृती समिती, विविध गडकोट संघटना, हिंदुत्वनिष्ठ संघटना करत होत्या. अखेरीस आता पुरातत्व विभागाला जाग आली असून विभागाने कोल्हापूर जिल्ह्यातील विशाळगडावर पशूहत्या करण्यास पुरातत्व विभागाची बंदी असल्याचा आदेश काढला आहे. याचसमवेत अमली पदार्थांचा व्यवसाय करण्यास बंदी घातली आहे. जिल्हाधिकारी यांनी याची कार्यवाही करावी, असे आदेश देण्यात आले आहेत.

विशाळगड

गेली अनेक वर्षे विशाळगडावर पशू-पक्षी यांची हत्या करून त्यांचे मांस शिजवण्यात येते. यामुळे त्यांची पिसे, तसेच अन्य मांस, रक्तही गडावर अनेक वेळा पसरते. यामुळे गडाचे पावित्र्य भंग होते. त्यामुळे गडावर पशूहत्या बंदी व्हावी, अशी मागणी अनेक वर्षांपासून होत होती; मात्र झोपेचे सोंग घेतलेल्या पुरातत्व विभागाकडून ती कृती होत नव्हती. अखेरीस जूनमध्ये पुरातत्व विभागाने हा आदेश काढला आहे.


Spread the love

Related posts

मणिपूर हिंसाचाराद्वारे भारताला अस्थिर करण्याचा विदेशी शक्तींचा डाव!जनपीस, डिजिटल सनातन योद्धा

news

कुंदे गावात आ. वैभव नाईक यांची विकास कामांची वचनपूर्ती…!

news

सह्याद्री फाउंडेशनच्या नूतन अध्यक्षपदी जिल्हा बँकेचे संचालक रवींद्र मडगावकर

news

Leave a Comment