स्टोरी

शिवसेना अंबरनाथ तालुका प्रमुखपदी जैनु जाधव यांची नियुक्ती!

Spread the love

कल्याण प्रतिनिधी:(आनंद गायकवाड): हिंदुह्यदयसम्राट मा. बाळासाहेब ठाकरे यांच्या कट्टर हिंदुत्ववादी विचारांशी प्रेरीत होवून गेली ३० वर्षाहून अधिक काळ शिवसेना पक्षात सक्रीय असलेले अंबरनाथ तालुक्यातील सक्रीय शिवसैनिक चैनु जाधव यांची शिवसेना अंबरनाथ तालुका प्रमुख पदी नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या या नियुक्तीने अंबरनाथ तालुक्यासह श्रीमलंग पट्टयातील गावखेड्यातून त्यांचेवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. अंबरनाथ तालुक्यासह श्रीमलंग पट्ट्यातील ग्रामिण भागात आपल्या कार्याची छाप पाडून समाजकार्यात अग्रेसर असलेले चैनु जाधव यांनी शिवसेना पक्षात फुट पडल्या नंतर राज्याचे विद्यमान मुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे यांच्याच बरोबर राहून पक्ष संघटन मजबूत करण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या एकनिष्ठतेची दखल घेत कल्याण लोकसभा मतदार संघाचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या शिफारसी नुसार आणि पक्षाचे मुख्य नेते नामदार एकनाथ शिंदे यांच्या आदेशाने चैनु जाधव यांची अंबरनाथ तालुका प्रमुख पदी नियुक्ती करण्यात आली असल्याचे कल्याण पूर्व शहर प्रमुख महेश गायकवाड यांनी सांगितले. चैनु जाधव यांच्या या नियुक्ती मुळे पक्ष संघटन अधिक मजबूत होणार असल्याचा विश्वास महेश गायकवाड यांनी व्यक्त करीत त्यांच्या भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.


Spread the love

Related posts

मेट्रो चालकांमध्ये ७ महिलांची वर्णी !

news

कुडाळ येथील वेलनेस मेडिकल स्टोअरचे आ. वैभव नाईक यांच्या हस्ते उदघाटन

news

संपात सहभागी होणाऱ्यांंवर शिस्तभंगाची कारवाई करणार! सुमंत भांगे.

news

Leave a Comment