शिक्षण

मुणगे ज्युनिअर कॉलेजचा बारावीचा निकाल १०० टक्के! ईशा प्रमोद हिर्लेकर प्रथम

Spread the love

देवगड :२५ मे वार्ता: देवगड तालुक्यातील मुणगे येथीलश्री भगवती एज्युकेशन सोसायटी संचलितश्री भगवती हायस्कुल आणि स्व. वीणा सुरेश बांदेकर ज्युनिअर कॉलेज ऑफ व्होके.कोर्सेसचा बारावीचा निकाल शंभर टक्के लागला आहे. ऑटोमोबाइल टेक्नॉलॉजी आणि अकौंटिंग या दोन विभागातून प्रथम क्रमांक ईशा प्रमोद हिर्लेकर (८१.३३%), द्वितीय क्रमांक सायली सुभाष परब (७५.१७%), तृतीय क्रमांक दिपेश दिनेश लब्दे (७४.३३%) यांनी यश प्राप्त केले.

प्रथम क्रमांक ईशा प्रमोद हिर्लेकर
द्वितीय क्रमांक सायली सुभाष परब
तृतीय क्रमांक दिपेश दिनेश लब्दे

एकूण ३७ विध्यार्थी प्रविष्ठ झाले होते. त्यापैकी दोन विध्यार्थी विशेष योग्यता, २४ विध्यार्थी प्रथम श्रेणीत तर ११ विध्यार्थी द्वितीय श्रेणीत पास झाले. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे व मार्गदर्शक शिक्षक यांचे संस्था अध्यक्ष न. ना. पंतवालावलकर, उपाध्यक्ष सुरेश बांदेकर, विलास मुणगेकर, सचिव विजय बोरकर, कार्याध्यक्ष नारायण आडकर, शाळा समिती अध्यक्ष निलेश परुळेकर, मुख्याध्यापिका श्रीमती एम. बी. कुंज, व्यवस्थापक देवदत्त पुजारे यांनी अभिनंदन केले आहे.


Spread the love

Related posts

ओझर विद्यामंदिरचा १००% निकाल!

news

प्राथमिक व माध्यमिक शिक्षकांसाठी मराठी विश्वकोश नोंद लेखन कार्यशाळेचे आयोजन.

newss

सिंधुदुर्ग सैनिक स्कूल आंबोली येथे तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन संपन्न.

news

Leave a Comment