स्टोरी

माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांच्या आंदोलनाला यश!

Spread the love

२५ मे वार्ता: जिमखाना जाधववाडी येथील जिमखाना ग्राउंड नाल्यावरील स्लॅब घालत असताना ठेकेदाराकडून चुकीच्या पद्धतीने सदर घळनीची खोदाई झाली होती. त्यामुळे जाधववाडी नाल्याच्या बाजूला व घरांनलगत असलेली घळन कोसळल्याने वरच्या भागात असलेल्या जाधव वाडीतील घरांना मोठ्या प्रमाणात धोका निर्माण झाला होता. या विषयाचे गांभीर्य लक्षात घेऊन माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी याबाबत तीव्र आंदोलन छेडले होते व सदर ठेकेदाराला पण धारेवर धरले होते. त्यानंतर जाधव वाडी येथील लोकांच्या घरांना धोका पोहोचू नये म्हणून लवकरात लवकर काम सुरू करण्याचेही आदेश त्यांनी नगरपरिषदेच्या अधिकाऱ्यांना दिले होते व आज त्यांच्याच प्रयत्नामुळे मागासवर्गीय निधीतून नगरपालिकेमार्फत जाधव वाडी येथील लोकांच्या घरांना धोका पोचू नये म्हणून सदर संरक्षण भिंत बांधण्याचे काम आज युद्ध पातळीवर सुरू आहे. जाधव वाडी येथील लोकांनी माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांचे आभार मानले आहे.


Spread the love

Related posts

वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवा’स उत्साही वातावरणात प्रारंभ !

news

अयोध्या येथे श्रीरामाच्या मूर्तीचा प्रतिष्ठापना सोहळा…!

news

१०३ वर्षांचे चिटणीस काका यांची सुनील राऊळ यांनी भेट घेत ऐतिहासिक जीवनप्रवासाचा घेतला आढावा..!

news

Leave a Comment