स्टोरी

पंतप्रधान मोदी २८ मे या दिवशी करणार नव्या संसद भवनाचे उद्घाटन!

Spread the love

सिंधुदुर्ग प्रतिनिधी: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शुभहस्ते २८ मे या दिवशी नवीन संसद भवनाचे उद्घाटन करण्यात येणार आहे. ‘सेंट्रल व्हिस्टा प्रकल्पां’तर्गत ही इमारत बांधण्यात आली आहे. १० डिसेंबर २०२० या दिवशी नवीन त्रिकोणी आकाराच्या संसद भवनाची पायाभरणी करण्यात आली, तर १५ जानेवारी २०२१ या दिवशी भवनाचे बांधकाम चालू झाले होते.

सध्याचे संसद भवन ९५ वर्षांपूर्वी वर्ष १९२७ मध्ये बांधण्यात आले होते. केंद्रशासनाने संसदेत सांगितले होते की, ही इमारत अधिक प्रमाणात वापरण्यात आली होती आणि ती खराब होत आहे. यासमवेतच लोकसभेच्या नव्या धोरणानंतर वाढणार्‍या खासदारांना बसण्यासाठी जुन्या इमारतीत पुरेशी जागा नाही.

नूतन संसद इमारतीची ही आहेत वैशिष्ट्ये!
४ मजली इमारत असून भूकंपाचा परिणाम नाही !
६४ सहस्र ५०० चौरस मीटर क्षेत्रफळात बांधली इमारत
३ दरवाजे असून ‘ज्ञान द्वार’, ‘शक्ती द्वार’ आणि ‘कर्म द्वार’ अशी नावे!
खासदार आणि अतीमहनीय व्यक्तींसाठी स्वतंत्र प्रवेशाची व्यवस्था!


Spread the love

Related posts

१२ ऑगस्‍टला पुणे येथील नवीन उड्डाणपुलाचे उद़्‍घाटन !

news

मराठा आणि धनगर आरक्षणासाठी संसदेचे विशेष अधिवेशन बोलवावे !

news

वि. स. खांडेकर विद्यालयात सीड बॉल व वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन….

news

Leave a Comment