क्राईम

बिनापरवाना वाळू वाहातुक करणाऱ्या चार डंपरवर दोडामार्ग पोलिसांची कारवाई

Spread the love

दोडामार्ग प्रतिनिधी: बिनापरवाना वाळू वाहातुक करणाऱ्या चार डंपरवर दि. ६ मे दिवशी दोडामार्ग पोलिसांनी कारवाई केली. बाजरपेठेपासून काही अंतरावरच कारवाईत डंपर सहित एकूण ३६, लाख ६४, हजार एवढा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या चारही डंपर चालकांवर वाळू चोरी प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली.       

मिळालेली माहिती अशी की, सावंतवाडीहून दोडामार्गच्या दिशेने चार डंपर विना परवाना वाळू वाहातुक करीत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. मिळालेल्या माहिती नुसार दोडामार्ग पोलिस बाजरपेठेपासून काही अंतरावर बांदा रोडवर गस्त घालून बसले होते. दरम्यान चारही डंपर येताच त्यांच्यावर धाड घातली. यावेळी त्यातील दोन डंपर चालकांनी पलायन केले. एमएच ०७ एक्स ०४९३, एमएच ०७ ईएन ०७०९, एमएच ०७ एजे ६१३१, एमएच ०७ एजे ९९८१ हे चारही डंपर पकडून पोलिस ठाण्याच्या आवारात आणले. प्रत्येकी ९,लाख १६, हजार मिळून चारही डंपर सहित ३६, लाख ६४, हजार एवढा मुद्देमाल जप्त केला आहे. तसेच हाती भेटलेल्या दोन डंपर चालकांनाही पोलिस ठाण्यात दाखल केले. पळून गेलेल्या दोन डंपर चालकांचा मालक कोण हे जाणून घेऊन मालकाशी संपर्क साधला व त्या दोन्हीं चालकांना पोलिस ठाण्यात हजर राहण्याची सूचना मालकाला दिली. त्यानुसार ते दोघेही चालक पोलिस ठाण्यात दुपारी स्वतःहून हजर झाले. पुढील कारवाई सुरु आहे


Spread the love

Related posts

देशातील दहशतवाद, गँगस्टर आणि अमली पदार्थांची तस्कर याला आळा घालण्यासाठी एनआयएकडून छापेमारी

news

मुंबई पोलिसांकडून एका आलिशान हॉटेलवर छापा! एका सेक्स रॅकेटचा पर्दाफाश

news

पिस्तूलची धाक दाखवून धमकावणाऱ्या नाशिर शेखवर कारवाई करा….रवी जाधव

news

Leave a Comment