स्टोरी

सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयामध्ये सोनोग्राफी सेवा सुरु! गरोदर महिलांसाठी मोफत सेवा.

Spread the love

सिंधुदुर्ग: सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयामध्ये आता गरोदर स्त्रियांची प्रस्तुती विषयाशी आवश्यक चाचण्या करिता गरोदर महिलांना सोनोग्राफी मशीनद्वारे तपासणी व रिपोर्ट ही सेवा मोफत मिळणार आहे. अशी माहिती उपजिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधीक्षक यांनी रवी जाधव यांना दिली. पहिल्या टप्प्यात ही अत्यावश्यक सेवा सुरू करण्यात आलेली आहे.

सामाजिक बांधिलकीचे पदाधिकारी आणि वैध्यकीय अधिकारी

याचा फायदा सर्वसामान्य रुग्णांना होणार आहे. तर दुसऱ्या टप्प्यामध्ये सोनोग्राफी संबंधित चाचण्या मुतखडा, प्रोस्टेल, हर्निया, पोपटाचे विकार अशाही प्रकारच्या रुग्णांना ही सुद्धा सेवा लवकरात लवकर उपलब्ध होण्यासाठी रवी जाधव यांनी जिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर सुबोध इंगळे यांच्याशी संपर्क साधला असता यासंबंधी टेक्निशियन व रीडोलॉजिस तज्ञ डॉक्टर यांची नेमणूक नजदीक च्या काळामध्ये लवकरात लवकर केली जाईल व सर्वप्रथम सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयामध्ये रेडिओलॉजी तज्ञ डॉक्टर पाठवण्याची व्यवस्था आम्ही लवकरात लवकर करू असे सामाजिक बांधिलकीचे रवी जाधव यांना सांगितले. जिल्हा रुग्णालयाचे सिविल सर्जन डॉक्टर नागरगोजे व वैद्यकीय अधिकारी डॉक्टर सुबोध इंगळे यांचे विशेष आभार सामाजिक बांधिलकी व जीवन रक्षा वैद्यकीय प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजू मसुरकर यांनी मानले.


Spread the love

Related posts

घराचे छप्पर कोसळलेल्या मांजरेकर याना भाजप कडून आर्थिक मदत!

news

ज्येष्ठ दशावतारी कलाकार यशवंत तेंडोलकर यांना राज्य सांस्कृतिक पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल आ. वैभव नाईक यांनी केला सत्कार

news

आम्हांला फसवणाऱ्यांना आमचा पाठिंबा नाही..! स्थानिक डी एड /डि टी एड बेरोजगार समिती, सिंधुदुर्ग

news

Leave a Comment