स्टोरी

शिवसेनेचे आमदार संजय रायमुलकर यांचा समृद्धी टोल प्लाझावर राडा!

Spread the love

एका व्हिडीओत शिवसेनेचे आमदार संजय रायमुलकर यांचा समृद्धी टोल प्लाझावर राडा दिसून आला. आमदार एका टोल मॅनेजरला चांगलेच खडसावत आहेत. एका कामगाराला कामावरून का काढलं. यावरून हे आमदार चांगलेच आक्रमक झालेत. त्यांनी थेट टोल प्लाझा गाठला. त्यानंतर मॅनेजरला अश्लिल शब्दात शिविगाळ केली. तू कुठला आहेस? जिथून आलास तिथं परत पाठविणं. टोल प्लाझा बंद करेन. आमदार, खासदाराला काही समजत नाही का? असा सज्जड दम या आमदाराने दिला आहे. दोन दिवसांपूर्वी मुलगा आला होता. त्याची तक्रार का केली. टोल कर्मचाऱ्याला कामावरून का काढून टाकलं? असा जाब संजय रायमुलकर यांनी टोल मॅनेजरला विचारलाआहे. संजय रायमुलकर यांनी टोल नाक्यावरील मॅनेजरला धमकावल्याचा आणि शिविगाळ केल्याचाही आरोप केला जातोय.


दोन दिवसांपूर्वी समृद्धीच्या मेहकर टोल प्लाझावरील पवन कुमार या मॅनेजरला रायमुलकर यांच्या मुलाने आणि एका शासकीय कर्मचाऱ्याने याच कारणावरून मारहाण केली होती. काल सायंकाळी आमदार रायमुलकर कार्यकर्त्यांना घेऊन समृद्धी टोल प्लाझावर गेले. टोल मॅनेजरला अश्लील शिवीगाळ करत टोल तोडण्याची धमकी दिली. या प्रकरणी अद्यापही पोलिसांत तक्रार नाही.


Spread the love

Related posts

देवस्थान उपसमिती स्थापन करण्यासह इतर समस्या सोडविण्याची मागणी…!

news

माणूसकी प्रतिष्ठानच्या वतीने विद्यार्थ्यांना वह्या, छत्री, चप्पल, व दप्तर या वस्तूंचे वितरण

news

सिंधुदुर्ग जिल्हा परिषद कर्मचारी पतसंस्था मर्यादित सिंधुदुर्ग या पतसंस्थेचे अध्यक्ष पदी श्री. संतोष परब……

news

Leave a Comment