स्टोरी

भंडारा जिल्ह्यातील गोसीखुर्द प्रकल्पात जलपर्यटन विकास करण्यासाठी पथदर्शी प्रकल्प राबविण्यात येईल! उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस.

Spread the love

राज्यातील जलसंपदा प्रकल्पांच्या परिसरात पर्यटन विकासासाठी मोठी संधी आहे. या संधी विकसित करण्यासाठी राज्य शासन प्रयत्नशील आहे. याचाच भाग म्हणून भंडारा जिल्ह्यातील गोसीखुर्द प्रकल्पात जलपर्यटन विकास करण्यासाठी पथदर्शी प्रकल्प राबविण्यात येईल, असे जलसंपदा मंत्री तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज स्पष्ट केले. विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळ आणि महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ यांच्या दरम्यान भंडारा जिल्ह्यातील गोसीखुर्द प्रकल्पात जलपर्यटन विकासाबाबत मेघदूत निवासस्थानी येथे सामंजस्य करारावर स्वाक्षरी करण्यात आली. त्यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलत होते.उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, जलपर्यटन, विशेषतः, दुर्गम भागात कमी वेळेत पर्यटन स्थळाच्या विकासात महत्त्वाची भूमिका बजावते आणि अर्थव्यवस्थेवर त्याच्या गुणाकार प्रभावामुळे अधिक रोजगार निर्माण करण्याची क्षमता आहे. आज झालेल्या सामंजस्य करारा मूळे गोसीखुर्द जलाशय आणि आसपासच्या जागतिक दर्जाच्या जल पर्यटन प्रकल्पाच्या माध्यमातून विकास करता येणार आहे. जगातील बहुतेक देशांच्या अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी पर्यटन हा मुख्य घटक मानला जातो आणि महाराष्ट्र सरकारने राज्यातील पर्यटन विकासावर विशेष लक्ष देत आहे.या सामंजस्य कराराद्वारे, विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळ, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाला जागतिक दर्जाचे जलपर्यटन विकसित होवून स्थानिक तरुणांसाठी ८०% रोजगार निर्मिती होईल. पर्यावरणास अनुकूल आणि शाश्वत पद्धतीने जलपर्यटन निर्माण होईल.राज्याच्या दुर्गम भागातील स्थानिक समुदायांच्या सामाजिक-आर्थिक विकासासाठी हा करार अत्यंत महत्वाचा आहे, असेही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.


Spread the love

Related posts

महाराष्ट्र नवनिर्माण सेना देवगड आयोजित २० मे रोजी महिला तसेच महिला बचतगटांसाठी भव्य प्रशिक्षण शिबिर! संतोष मयेकर

news

‘लव्ह जिहाद’ रोखण्यासाठी गरब्यात अहिंदूंना प्रवेशबंदी करा !

news

गुरुपौर्णिमे निमित्त कल्याण पूर्वेतून निघाली विजयनगर ते वर्तकनगर, ठाणे भव्य साई पायी पालखी!

news

Leave a Comment