स्टोरी

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या आश्रय योजना कक्ष टप्पा दोन अंतर्गत नव्याने बांधण्यात आलेल्या कर्मचारी निवासस्थानांच्या चाव्या वाटपाचा शुभारंभ सोहळा संपन्न.

Spread the love

मुंबई: बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या आश्रय योजना कक्ष टप्पा दोन अंतर्गत नव्याने बांधण्यात आलेल्या कर्मचारी निवासस्थानांच्या चाव्या वाटपाचा शुभारंभ सोहळा आज धनत्रयोदशीच्या मुहूर्तावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शुभहस्ते संपन्न झाला. कुलाबा येथील राजवाडकर मार्गावरील पंचशील नगर येथे पार पडलेल्या या सोहळ्यात १४० सफाई कर्मचाऱ्यांना घरांच्या चाव्या सुपूर्द करण्यात आल्या.मुंबईचे आरोग्य जपणाऱ्या आणि शहर स्वच्छ ठेवण्यासाठी अहोरात्र मेहनत घेणाऱ्या सफाई कर्मचाऱ्यांच्या हक्काच्या घरांचे स्वप्न साकार करण्यासाठी राज्य सरकार कटिबद्ध आहे. सफाई कर्मचारी हेच मुंबईचे खरे हिरो असून त्यांना चांगले जीवनमान आणि सन्मानाचे निवासस्थान मिळणे ही सरकारची जबाबदारी असल्याचे याप्रसंगी नमूद केले.स्वच्छता कर्मचाऱ्यांना पूर्वी १५० चौरस फुटांची घरे मिळत होती, आता ३०० चौरस फुटांची प्रशस्त घरे उपलब्ध करून दिली जात आहेत. प्रीफॅब्रिकेटेड तंत्रज्ञानाचा वापर करून जलदगतीने आणि दर्जेदार घरांचे बांधकाम करण्याचा महापालिकेचा हा अभिनव प्रयोग आहे. ही घरे १०० वर्षांपेक्षा अधिक काळ टिकावीत, अशा गुणवत्तेवर भर देण्यात आला आहे. लाड-पागे समितीच्या तरतुदींनुसार पात्र कर्मचाऱ्यांच्या कुटुंबांना या योजनेचा लाभ मिळत असून, पुढील टप्प्यात उर्वरित पात्र कर्मचाऱ्यांनाही घरे दिली जातील असे यावेळी बोलताना स्पष्ट केले.याप्रसंगी विधानसभा अध्यक्ष ॲड.राहुल नार्वेकर, मुंबईच्या महापौर रितू तावडे, उपमहापौर संजय घाडी, महापालिका आयुक्त अश्विनी भिडे, शिवसेना गटनेते अमेय घोले, अतिरीक्त आयुक्त विपीन शर्मा आणि इतर मान्यवर उपस्थित होते.


Spread the love

Related posts

लखनऊ- रामेश्वर ट्रेनला भीषण आग.

news

‘द केरल स्टोरी’च्या प्रसारणावर बंदी घालणे अयोग्य!सर्वोच्च न्यायालय

news

शहरात सुव्यवस्था बिघडल्यास पोलीस प्रशासन जबाबदारी घेणार का? रवी जाधव 

news

Leave a Comment