नवी मुंबई | जितीन शेट्टी: नेरुळ सेक्टर-6 येथून 13 ऑक्टोबर 2026 रोजी संध्याकाळी सुमारे 6 वाजल्यापासून श्री. विकास दत्तात्रय तांडेल (70) बेपत्ता आहेत. त्यांनी फिकट गुलाबी रंगाचा शर्ट आणि काळी पँट परिधान केली होती. त्यांना स्मरणशक्तीशी संबंधित समस्या आहे, त्यामुळे ते आपले नाव-पत्ता सांगण्यास असमर्थ असू शकतात. कुटुंबाचे आवाहन : जो कोणी त्यांचा शोध घेऊन त्यांना सुरक्षितपणे त्यांच्या कुटुंबीयांपर्यंत पोहोचवेल, त्याला कुटुंबाकडून बक्षीस देण्यात येईल. संपर्क : 9768519078 कृपया ही बातमी जास्तीत जास्त शेअर करा आणि त्यांना सुरक्षितपणे घरी पोहोचविण्यास मदत करा.
