स्टोरी

तांबुळी केंद्रशाळेत मूल्यवर्धन विशेष शिक्षण परिषद उत्साहात संपन्न.

Spread the love

सावंतवाडी: मूल्यवर्धन कार्यक्रमाची प्रभावी अंमलबजावणी करून विद्यार्थ्यांमध्ये अपेक्षित अध्ययन निष्पत्ती साध्य करण्यासाठी तांबुळी केंद्रांतर्गत केंद्रशाळा तांबुळी नं. १ येथे दि. १२ ऑक्टोबर रोजी मूल्यवर्धन विशेष शिक्षण परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. या परिषदेत मूल्यवर्धन कार्यक्रमातील मूल्ये, क्षमता, अध्ययन निष्पत्ती, नवीन शैक्षणिक वर्षातील उद्दिष्टे आणि शिक्षकांची भूमिका यांवर सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. परिषदेत केंद्रातील शिक्षकांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, पुणे यांच्या मार्गदर्शनानुसार तसेच शांतीलाल मुथ्था फाउंडेशनच्या सहकार्याने राबविण्यात येणाऱ्या मूल्यवर्धन उपक्रमांतर्गत या परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था (DIET), सिंधुदुर्ग यांच्या सूचनेनुसार ऑक्टोबर २०२६ या महिन्यातील केंद्रस्तरावर ही विशेष शिक्षण परिषद घेण्यात आली. परिषदेची सुरुवात उद्घाटन सत्राने झाली. त्यानंतर उजळणी कार्यशाळेचा परिचय, उजळणी कार्यशाळेचा उद्देश आणि मूल्यवर्धनमधील मूल्ये, क्षमता व अध्ययन निष्पत्ती यांविषयी राज्यस्तर सुलभक श्री. दत्ताराम सावंत (सरमळे शितप) यांनी मार्गदर्शन केले.

उपस्थित मान्यवर

नवीन शैक्षणिक वर्षातील मूल्यवर्धनाची सहा लक्ष्ये, वर्गानियम व त्याचे परिणाम, सहयोगी अध्ययन रचना, शांतता संकेताचा योग्य वापर, सर्व विदयार्थ्याचा सक्रीय सहभाग, आणि त्यांची क्रमवार अंमलबजावणी यांवर जिल्हास्तर सुलभक डॉ. राजेंद्र चव्हाण (कोनशी) यांनी सविस्तर मार्गदर्शन केले. तसेच मूल्यवर्धनाची उद्दिष्टे साध्य करण्यासाठी आवश्यक नियोजन, अध्यापनातील उपक्रम आणि विद्यार्थ्यांच्या सहभागाचे महत्त्व त्यांनी स्पष्ट केले. मूल्यवर्धन उपक्रमांचे प्रात्यक्षिक सादर करताना राज्यस्तर सुलभक श्री. दत्ताराम सावंत (सरमळे शितप) यांनी विविध उपक्रमांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये सकारात्मक दृष्टिकोन, सहकार्य, जबाबदारी आणि जीवनोपयोगी मूल्ये विकसित करण्याचे महत्त्व स्पष्ट केले त्यानंतर जिल्हा स्तर सुलभक श्री आशिष तांदुळे (घारपी) यांनी शिक्षण परिषदेमध्ये शिक्षकांची भूमिका, उपक्रमांची प्रभावी अंमलबजावणी, अध्यापन नियोजन आणि मूल्यांकन या बाबींवरही चर्चा झाली. तसेच मागील वर्षातील अनुभवांची देवाणघेवाण, शंकानिरसन आणि प्रत्यक्ष कृतीच्या माध्यमातून उपक्रम अधिक परिणामकारक कसा करता येईल, यावर भर देण्यात आला. परिषदेच्या अखेरच्या सत्रात सहभागी शिक्षकांनी आपले अभिप्राय मांडले. चर्चेच्या माध्यमातून मूल्यवर्धन उपक्रम राबविताना येणाऱ्या अडचणी, त्यावरील उपाय आणि शालेय स्तरावरील प्रभावी नियोजन यांवर विचारविनिमय करण्यात आला.

श्रीमती ज्योत्स्ना देसाई, केंद्रप्रमुख यांनी समारोपाच्या सत्रात मार्गदर्शन केले. या परिषदेमुळे शिक्षकांना मूल्यवर्धन उपक्रमांची उद्दिष्टे, त्यांची प्रभावी अंमलबजावणी आणि विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासातील शिक्षकांचे योगदान यांविषयी अधिक स्पष्टता मिळाली. परिषदेच्या माध्यमातून शिक्षकांना मूल्यवर्धन उपक्रमाची उद्दिष्टे अधिक स्पष्टपणे समजून घेण्याची तसेच वर्गस्तरावर त्याची प्रभावी अंमलबजावणी करण्याची संधी मिळाली. विद्यार्थ्यांमध्ये अपेक्षित मूल्ये, क्षमता आणि अध्ययन निष्पत्ती विकसित करण्यासाठी शिक्षकांनी समन्वयाने प्रयत्न करण्याचा संदेश या परिषदेतून देण्यात आला. विद्यार्थ्यांमध्ये केवळ शैक्षणिक ज्ञान न रुजवता जीवनोपयोगी मूल्ये, सामाजिक जाणीव आणि सकारात्मक दृष्टिकोन विकसित करण्यासाठी अशा शिक्षण परिषदांचे महत्त्व अधोरेखित झाले. केंद्रप्रमुख श्रीमती ज्योत्स्ना देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली परिषदेचे आयोजन करण्यात आले. विशेष शिक्षण परिषदेसाठी मूल्यवर्धनचे सावंतवाडी तालुका समन्वयक श्री समीर घाडी उपस्थित होते. तांबुळी केंद्रातील कोनशी, घारपी, सरमळे देऊळ, असनिये, तांबुळी, सरमळे शितप, भालावल आणि श्री शिवछत्रपती माध्यमिक विद्यालय, असनिये शाळेच्या शिक्षकांच्या सक्रिय सहभागामुळे परिषद उपयुक्त आणि मार्गदर्शक ठरली.


Spread the love

Related posts

कला दिग्दर्शक नितीन देसाई आत्महत्या प्रकरण अपडेट्स!

news

पुण्यात पकडलेल्या २ आतंकवाद्यांनी पुणे, सातारा आणि कोल्हापूर येथील जंगलात बाँबस्फोटाची चाचणी केल्याचे उघड!

news

आसोलीतील श्री नारायण विद्यामंदिर शाळेचा* *१६ ते १८ मेपर्यंत शतक महोत्सव कार्यक्रम

news

Leave a Comment