.
सावंतवाडी (म.ल.देसाई): महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ मुंबई, नेमळे पंचक्रोशी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय नेमळे ता. सावंतवाडी व श्रीदेवी सातेरी ग्रंथालय व सांस्कृतिक कलाक्रीडा मंडळ नेमळे यांच्या संयुक्त विदयमाने दि.१५ ऑक्टोबर रोजी डॉ. ए.पी.जे .अब्दुल कलाम यांच्या जन्मदिनी ”वाचन प्रेरणा दिन” साजरा केला जाणार आहे. त्या निमित्ताने वाचन संस्कृती वाढवणे, विश्वकोश बाबत माहिती देणे, याकरिता कार्यक्रमाचे आयोजन नेमळे पंचक्रोशी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय नेमळे येथे सकाळी दहा वाजता करण्यात आले आहे . या कार्यक्रमात शालेय विद्यार्थ्यांसाठी वाचक स्पर्धा घेण्यात येणार आहे. विषय मी वाचलेले पुस्तक, दोन मला आवडलेले पाठ्यपुस्तक यावर पाच मिनिटे वेळ दिला जाईल. गट इयत्ता सहावी ते आठवी असा आहे एका शाळेला एक किंवा दोनच विद्यार्थ्याना भाग घेता येईल व स्पर्धा सावंतवाडी तालुका मर्यादित आहे. विजेत्या विद्यार्थ्यांना पारितोषिक म्हणून रोख रक्कम, प्रमाणपत्र, ग्रंथ भेट देऊन गौरविण्यात येणार आहे. ग्रंथ प्रदर्शन कर्यक्रम होणार आहे .या कार्यक्रमाला मार्गदर्शक म्हणून वर्षा देवरुखकर संपादकीय सहाय्यक मराठी विश्वकोश निर्मीती मंडळ,सदस्य महादेव देसाई ,वामन पंडित, वृंदा कांबळी, डॉ.शरयू आसोलकर, सहाय्यक सचिव डॉ .ललित कुडमथे त्याचप्रमाणे साहित्य संस्कृती मंडळाचे सदस्य भरत गावडे ,विठ्ठल कदम ,संस्थेचे अध्यक्ष आत्माराम राऊळ, प्रशालेचे मुख्याध्यापक राम राठोड व अन्य शिक्षक प्रेमी व ग्रंथ प्रेमी उपस्थित राहणार आहेत.
