स्टोरी

संतामुळेच आपली मायबोली टिकून आहे…! प्रा.भरत गावडे.

Spread the love

सावंतवाडी प्रतिनिधी: रोटरी क्लब ऑफ सावंतवाडी व आचार्य विनोबा भावे माध्यमिक विद्यालय कुणकेरी यांच्या संयुक्त विद्यमाने मराठी अभिजात भाषा सप्ताह निमित्त वाचू आनंदे हा कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी वक्ते साहित्य मंडळाचे सदस्य भरत गावडे आपल्या मार्गदर्शक पर भाषणात म्हणाले, मराठी भाषेला तीन ऑक्टोबर २०२४ ला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला. हे आपल्या मराठी भाषेच्या दृष्टीने गौरवाची व अभिमानाची बाब आहे. आपण आपल्या भाषेवर प्रेम केले पाहिजे. अधिकाधिक मराठीतूनच बोलण्याचा प्रयत्न केला पाहिजे. त्याचप्रमाणे वाचन संस्कृती वाढवण्यासाठी आपण शालेय जीवनातूनच पाठ्यपुस्तके व अवांतर वाचन याकडे अधिक लक्ष देणे गरजेचे आहे. मातृभाषेप्रमाणेच बोलीभाषेकडे आपण अधिक लक्ष दिला पाहिजे आपली बोलीभाषा मालवणी आहे. गावडे पुढे म्हणाले,संतामुळेच आपली मायबोली टिकून आहे. म्हणून संत साहित्य वाचावे, साने गुरुजींची श्यामची आई पुस्तकाचा त्यातून आपल्या मनावर चांगले संस्कार होणारे आपल्या व्यक्तिमत्व विकासासाठी वाचन हे अत्यंत आवश्यक बाब आहे.

यावेळी व्यासपीठावर रोटरी क्लबचे अध्यक्ष प्रवीण परब, प्रमोद भागवत मुख्याध्यापिका अर्चना सावंत, माजी मुख्याध्यापक भरत सराफदार उपस्थित होते. एक तासाच्या कार्यक्रमानंतर मुलांनी आपले मनोगत व्यक्त केले. आज आम्ही खऱ्या अर्थाने धन्य झालो मराठी भाषेचा गुणगौरव आम्हाला ऐकता आला. अशा भावना व्यक्त केली. अधिकाधिक आम्ही संवाद साधू व प्रकट वाचन करून असे मुलांनी सांगितले विचारलेल्या पाच प्रश्नांची उत्तर देणाऱ्या पाच विद्यार्थ्यांचा ग्रंथ भेट देऊन गौरव करण्यात आला. तर आभार भरत सराफदार यांनी मानले.


Spread the love

Related posts

कांदळगाव येथे लक्ष्मी पूजन निमित्त १२ पासून विविध कार्यक्रम !

news

कलंबिस्त ज्ञानमंदिर वाचनालयाला महेश कलंबिस्तकर यांच्या स्मरणार्थ ३१२० रुपये किंमतीची नविन पुस्तकांची देणगी.

प्रसाद परब

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे तसेच इतरांविरुद्ध तक्रार दाखल

news

Leave a Comment