स्टोरी

सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठान स्वच्छ दूतांसाठीचे आरोग्य शिबिर व शिदा वाटप कार्यक्रम उत्साहात संपन्न.

Spread the love

सावंतवाडी (रवी जाधव): सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानच्या वतीने सावंतवाडी शहर व हॉस्पिटल स्वच्छ ठेवणाऱ्या या स्वच्छता दूतांसाठी आरोग्य शिबिर व शिधावाटप तसेच 25 दिव्यांग मुलांसाठी शैक्षणिक साहित्य वाटप कार्यक्रम सामाजिक क्षेत्रातील सेवाभावी मान्यवरांच्या उपस्थित मोठ्या उत्साहाने पार पडला.यामध्ये स्वच्छता दूत, गावातील कष्टकरी भाजी विक्रेत्या ज्येष्ठ महिला व दिव्यांग मुलंअसे मिळून 145 जणांनी या उपक्रमाचा लाभ घेतला. या कार्यक्रमाला सावंतवाडी शहरातील प्रसिद्ध डॉ.उमेश मसुरकर निसर्गप्रेमी प्रसाद गावडे (रानमाणूस) आपला दवाखाना डॉ.हर्ष ईश्वरा सागावकर व उपजिल्हा रुग्णालय अधीक्षक फिजिशियन डॉ. विशाल रेड्डी ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष यांची प्रमुख उपस्थिती लाभली. संस्थे कडून सत्कारमूर्ती डॉ. उमेश मसुरकर, प्रसाद गावडे, डॉ. हर्ष ईश्वरा सागावकर, ज्येष्ठ नागरिक अध्यक्ष व सर्व ज्येष्ठ नागरिक, डॉ. विशाल रेड्डी, साजिया पडवेकर, दीपक म्हापसेकर,विदिशा सावंत, द्रोपती राऊळ,मंगेश सावंत, महेश परुळेकर व रील स्टार जपा यांना शाल श्रीफळ व स्मृतिचिन्ह देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला.

filter: 0; fileterIntensity: 0.0; filterMask: 0; hdrForward: 0; brp_mask:0;
brp_del_th:null;
brp_del_sen:null;
delta:null;
module: photo;hw-remosaic: false;touch: (-1.0, -1.0);sceneMode: 128;cct_value: 0;AI_Scene: (-1, -1);aec_lux: 0.0;aec_lux_index: 0;HdrStatus: auto;albedo: ;confidence: ;motionLevel: -1;weatherinfo: null;temperature: 36;

हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना डॉ.हर्ष ईश्वरा सागावकर व त्यांची टीम यांच्या मार्फत ९५ स्वच्छता दुतांची मोफत आरोग्य शिबिरामध्ये तपासणी करून डॉ.सागावकर यांनी स्वखर्चाने इंजेक्शन व औषध-गोळ्या रुग्णांना दिल्या तसेच काही औषधे जनलोक मेडिकलचे मालक महेश परुळेकर यांनी विना मूल्य औषध पुरवली यांचा विशेष अभिनंदन करण्यात आला. या उपक्रमाला स्वच्छता दूतांनी ही मोठा सहभाग दर्शवला.

संस्थेचे अध्यक्ष प्रा. सतीश बागवे म्हणाले की आमची टीम २4 तास लोकांच्या सेवेमध्ये कार्यरत असते निराधार व गोरगरिबांची सेवा करण्याची संधी आम्हाला मिळाली हे आमचे भाग्य समजतो असे ते म्हणाले. याही पुढे आम्ही अशाच प्रकारची सेवा सुरू ठेवणार आहोत तर या उपक्रमासाठी पुढाकार घेणारे संस्थेचे सल्लागार व यशस्वी उद्योजक शैलेशजी पै म्हणाले की सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठान हे शहरात माणुसकी जपण्याचे काम करत आहे अपघात होऊन रस्त्यावर पडलेला अपघात ग्रस्त, रस्त्यावर जखमी अवस्थेत पडलेली निराधार व्यक्ती यांना संस्थेच्या रुग्णवाहिकेमध्ये घालून त्यांना हॉस्पिटलमध्ये वेळेत पोचवून त्यांचे जीव वाचवण्याचे बहुमूल्य काम ते करतात तसेच प्रत्येकाच्या संकटात अहो रात्री जीवाची परवा न करता त्यांच्या संकटात धावण्याचे महान कार्य सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानचे कार्यकर्ते कुठल्याही प्रकारचे सत्कार पुरस्काराची अपेक्षा न बाळगता निस्वार्थपणे हे सेवाभावी काम करणारे काम करणारे संस्थेचे आधारस्तंभ रवी जाधव, रूपा मुद्राळे लक्ष्मण कदम, समीरा खलील, हेलन निबरे हे प्रामुख्याने करत असतात. आपले शहर स्वच्छ व सुंदर ठेवणाऱ्या आमच्या स्वच्छता दूतांचे हि आरोग्य चांगले राहिले पाहिजे याकरिता त्यांच्यासाठी सुद्धा संस्थेच्या माध्यमातून विविध उपक्रम राबवली जातात. हे आपले स्वच्छता दूत आहेत म्हणून आज आपले आरोग्य चांगले आहे. त्यांच्याहि आरोग्याची काळजी घेणे हि काळाची गरज ओळखून सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठान त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहीली आहे. या दूतांना कुठच्याही प्रकारची गरज भासल्या त्यांनी थेट सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानशी संपर्क साधावा व दरवर्षी अशाच प्रकारे कार्यक्रम घेतला जाईल अशी ग्वाही या कार्यक्रमा प्रसंगी केले आहे.

निसर्गप्रेमी प्रसाद गावडे राणमाणूस यांनी निसर्गाचा समतोल कसा राखता येईल तसेच कचऱ्याचे प्रमाण कशा पद्धतीने कमी करता येईल यासाठी नागरिकांनी काय केले पाहिजे या संदर्भात तील देखील बहुमूल्य मार्गदर्शन प्रसाद गावडे यांनी केल. आपले आरोग्य कसे चांगले राहील यासंदर्भात मार्गदर्शन डॉक्टर हर्ष ईश्वरा सागावकर व सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयाचे अधीक्षक फिजिशियन डॉ.रेड्डी यांनी केले. डॉ. उमेश मसुरकर म्हणाले की सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठाने आपला सन्मान व सत्कार केला या सन्मानाने मी भारावून गेलो आज 32 वर्षे मी गोरगरीब रुग्णांना सेवा दिली त्याचं फळ मला आज मिळाल्यासारखं वाटत आहे. मी सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानच्या सेवाभावी उपक्रमात नेहमी सहभागी होईन काही गरज भासल्यास आपण माझी मदत घेऊ शकतात असे ते म्हणाले.

स्वच्छता दूतांचे युनियन लीडर बाबू बरागडे म्हणाले की आज पर्यंत आमच्यासाठी कोणीही काही केलं नाही एवढं काम या संस्थेचे सल्लागार शैलेशजी पै. आणि सामाजिक बांधिलकीच्या सर्व सदस्यांना केले आहे आमच्या प्रत्येक सुखदुःखामध्ये ते नेहमी सहभागी असतात याचा आम्हाला अभिमान वाटतो. तर पडवेकर यांनी सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठान सेवाभावी उपक्रमात मोफत पणे महिलांना प्रशिक्षण दिले त्या पुढे म्हणाल्या या संस्थेच्या सहवासात राऊत माणूसकी म्हणजे काय असते याचे जिवंत उदाहरण पाहायला मिळाले.आज यांच्या कार्याने आपण भारून गेलो. ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष यांनी सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानच्या या सेवाभावी कार्याला आपला कायम पाठिंबा असणार आहे असे सांगितले. समाजामध्ये वावरत असताना सामाजिक भान ठेवून आपण जेव्हा एखादा चांगलं कार्य करतो एखाद्या आल्या संकटात न बाहेर काढतो त्यावेळी त्याच्या चेहऱ्यावरचा आनंद म्हणजेच सामाजिक बांधिलकीआणि हीचं सामाजिक बांधिलकी कायम जोपासण्याचा प्रयत्न या संस्थेकडून होईल यात मात्र तीळ मात्र शंका नाही. या कार्यक्रमाला प्राध्यापक सुभाष गोवेकर, रूपाली पाटील, सामाजिक बांधणी प्रतिष्ठानचे संजय पेडणेकर, समीरा खलील,अशोक पेडणेकर, सुजय सावंत लक्ष्मण कदम, हेलन निबरे, शरदिनी बागवे, रूपा मुद्राळे, शेखर सुभेदार, हॉस्पिटल आरोग्य व नगरपरिषद स्वच्छता दूत तसेच ज्येष्ठ नागरिक यांची मोठी उपस्थिती लाभली. कार्यक्रमाच्या शेवटी संस्थेचे कार्याध्यक्ष संजय पेडणेकर यांनी सर्वांचे आभार मानले.


Spread the love

Related posts

कोल्हापूर जिल्ह्यातील १९ मंदिरांमध्ये भारतीय संस्कृतीनुसार वस्त्रसंहिता लागू ! – सुनील घनवट, समन्वयक, महाराष्ट्र मंदिर महासंघ

news

’शाश्वत आनंदप्राप्तीसाठी साधना आणि स्वभावदोष निर्मूलन आवश्यक! कु. मिल्की अग्रवाल….

news

निराधार वृद्ध आजारी अवस्थेत रस्त्यावर तळमळताना पाहून सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांनी हॉस्पिटलमध्ये केली दाखल.

news

Leave a Comment