स्टोरी

सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी डॉ. अपूर्वा बासूर.

Spread the love

सिंधुदुर्ग: सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या नव्या मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून भारतीय प्रशासकीय सेवेतील अधिकारी डॉ. अपूर्वा बासूर यांनी पदभार स्वीकारला आहे. जिल्हा परिषद मुख्यालयात त्यांनी प्रशासकीय कामकाजाची सूत्रे हाती घेतली. पदभार स्वीकारल्यानंतर जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी जिल्ह्यात त्यांचे स्वागत पुष्पगुच्छ देऊन केले. तसेच जिल्हा परिषदेच्या विविध विभागांतील खातेप्रमुखांनी तसेच कर्मचाऱ्यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. डॉ. अपूर्वा बासूर या २०२२ च्या बॅचच्या महाराष्ट्र केडरच्या आयएएस अधिकारी असून, प्रशासकीय सेवेत आल्यानंतर त्यांनी वाशिम येथे अतिरिक्त सहाय्यक जिल्हाधिकारी, चंद्रपूर जिल्ह्यातील गोंडपिपरी येथे सहाय्यक जिल्हाधिकारी, पालघर जिल्ह्यातील जव्हार येथे उपविभागीय अधिकारी तथा एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाच्या प्रकल्प अधिकारी म्हणून उल्लेखनीय काम केले.


Spread the love

Related posts

मुणगे तिठा येथे ३० रोजी ‘अघोर लक्ष्मी’ नाट्यप्रयोग!

news

दिनेश गावडे यांच्या वतीने प्राथमिक व माध्यमिक शाळांमध्ये विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वितरण.

news

अडीच लाख रुपयांचा निधी स्वतःच्या खिशातून त्वरित देणारा दत्ता सामंत खरा देवदूत ….

news

Leave a Comment