स्टोरी

‘डीजे’मुक्त उत्सव व्हायला हवा; पण धर्म, संस्कृती, उत्सव यांवरील टीका खपवून घेणार नाही !

Spread the love

पुणे ( संतोष परब): गणेशोत्सवातील ‘डीजे’ आणि ध्वनीप्रदूषणाचा विषय सध्या बराच चर्चेत आहे. हिंदु जनजागृती समिती गेल्या २४ वर्षांपासून ‘उत्सवांमध्ये डीजे किंवा कर्णकर्कश ध्वनीवर्धक लावू नका’ याविषयी प्रबोधन करत आहे. ‘उत्सवांतील गैरप्रकार रोखा’ अशी व्यापक प्रबोधनपर मोहिम राबवत आहे. डॉ. नरेंद्र दाभोळकर यांनी काही वर्षांपूर्वी जसे ‘गणेशमूर्तींचे नदीत विसर्जन केल्याने जलप्रदूषण होते’, हा प्रचार करत नॅरेटिव्ह सेट केला होता. वर्षातील ३६५ दिवस नदी प्रदूषित होण्याला ज्या गंभीर गोष्टी कारणीभूत आहेत, त्याकडे सोयीस्कर दुर्लक्ष करून केवळ गणेशोत्सवतील १० दिवसांत प्रदूषण होते, म्हणून कृत्रिम हौदांची टूम चालू झाली. त्याच प्रकारे आता ध्वनिप्रदूषणाची टूम आली आहे. ‘डीजे’मुळे गणेशोत्सवात होणारे ध्वनीप्रदूषण नक्कीच थांबायला हवे, पण वर्षभर ध्वनीप्रदूषण करणाऱ्या अन्य कारणांचा आपण विचार करणार आहोत कि नाही ? विद्यानंद बापट ‍आणि पुरोगामी टोळी जी मागणी करत आहे, त्यांनी ध्वनीप्रदूषण करणारे मशिदींवरील भोंगे उतरवा, थर्टी फर्स्टच्या रात्रीचे कार्यक्रम, तसेच ‘सनबर्न’सारखे मोठे म्युझिक इव्हेंट थांबवा, ही मागणी पण करणार आहेत का? केवळ गणेशोत्सवाला लक्ष्य करून हिंदु धर्मातील ‘द्वैत-अद्वैत तत्त्वज्ञाना’ला ‘बौद्धिक हस्तमैथुन’ म्हणणे, सण-उत्सवांना ‘लष्करे-उत्सव’ म्हणणे, ही ध्वनीप्रदूषणाच्या सूत्राच्या आडून धर्मावर आघात करणारी तथाकथित पुरोगामी मानसिकता दिसून येते, याचा आम्ही निषेध करतो. भारतात संविधानाचे राज्य आहे, त्यामुळे ध्वनीप्रदूषणाच्या संदर्भात सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशानुसार अवश्य कारवाई व्हावी; मात्र ‘अभिव्यक्ती स्वातंत्र्या’च्या नावाखाली हिंदु धर्मावर टीका करणाऱ्यांवरही कायद्यानुसार कारवाई व्हायला हवी, अशी आम्ही मागणी हिंदु जनजागृती समितीने केली आहे. हिंदु जनजागृती समिती उत्सवाचे पावित्र्यरक्षण आणि धार्मिकता जपण्यासाठी मंडपांमध्ये जुगार खेळणे, दारू पिणे, दारूच्या नशेत अंगविक्षेप नृत्य करणे, श्री गणेश मंडपासमोर अश्लील गाणी लावणे, मंडपासमोर मद्यपान-धुम्रपान करणे, सक्तीने वर्गणी मागणे आदी गैरप्रकारांविरोधात दोन दशकांपासून जनजागृती करत आहे. त्यामुळे ‘डीजे विरोध’ एवढीच आमची भूमिका नसून ‘आदर्श आणि सात्त्विक सार्वजनिक उत्सव’ ही आमची व्यापक भूमिका आहे. गणेशोत्सव धर्माचरण, संस्कृतीचे संवर्धन, राष्ट्रभक्ती, समाजप्रबोधन आणि समाजोपयोगी उपक्रम यांना प्रोत्साहन देण्यासाठी एक महत्त्वाचे व्यासपीठ आहे. या दृष्टीने त्याकडे पहायला हवे, असेही समितीने म्हटले आहे.

आपला नम्र.

श्री. सुनील घनवट, राज्य संघटक, महाराष्ट्र आणि छ‌‌त्तीसगडहिंदु जनजागृती समिती, संपर्क क्र. : ७०२०३८३२६४


Spread the love

Related posts

पर्यटन विकासासाठी पर्यटन कंपन्यानी भर देऊन दुर्लक्षित कोकण सागरी किनारी पर्यटन वाढवूया..! ललित गांधी

news

राजकोट किल्ला तटबंदी आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या चौथऱ्याचे काम निकृष्ट दर्जाचे….!

news

हिंदूंच्या धर्मांतराला ‘बॉलीवूड’ उत्तरदायी! मध्यप्रदेशातील आय.ए.एस्. अधिकारी नियाझ खान.

news

Leave a Comment