क्राईम

हद्दपार आदेशाचे उल्लंघन असलेला आरोपी मोहम्मद सरफराज बहाउद्दीन ख्वाजा जिल्ह्यात बिनधास्त कार्यरत..!

Spread the love

सावंतवाडी (श्री संतोष परब): हद्दपार आदेशाचे उल्लंघन करून सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रवेश केल्यानंतर गोवंशाची कत्तल केलेले मांस विक्रीसाठी वाहतूक केल्याप्रकरणी सावंतवाडी पोलिसांनी मोहम्मद सरफराज बहाउद्दीन ख्वाजा (वय ४५, रा. घर क्र. १४५, बाहेरचावाडा, सावंतवाडी) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. त्याच्याकडून २४.८०० किलो वजनाचे गोमांस सदृश्य मांस, ज्युपिटर मोपेड आणि लोखंडी कोयता असा एकूण सुमारे १ लाख १७ हजार ५४० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी (दि. ३ सप्टेंबर) सायंकाळी सुमारे ५.४० वाजण्याच्या सुमारास बाहेरचावाडा परिसरात ही कारवाई करण्यात आली. ख्वाजा याच्यावर उपविभागीय दंडाधिकारी, सावंतवाडी यांच्या आदेशानुसार दोन वर्षांसाठी सिंधुदुर्ग, कोल्हापूर व रत्नागिरी जिल्ह्यांच्या हद्दीतून हद्दपारीची कारवाई करण्यात आली होती. संबंधित आदेशाची बजावणी २७ जून २०२६ रोजी करण्यात आली होती. त्यावेळी आपण गोवा येथे राहणार असल्याचे त्याने लेखी जबाबात नमूद केले होते. मात्र, या आदेशाचे उल्लंघन करून तो सिंधुदुर्ग जिल्ह्यात आल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. दरम्यान, गोवंशीय जनावरांच्या कत्तलीस बंदी असतानाही कत्तल केलेले मांस विक्रीच्या उद्देशाने ज्युपिटर मोपेडच्या डिकीमध्ये ठेवून वाहतूक केली जात असल्याचा आरोप पोलिसांनी केला आहे. त्याच्या राहत्या घरासमोरील सार्वजनिक रस्त्यावर पोलिसांनी त्याला पकडले. त्याच्याकडून काळ्या रंगाच्या २४ प्लास्टिक पिशव्यांमध्ये भरलेले २४.८०० किलो मांस जप्त करण्यात आले. त्याची किंमत ७ हजार ४४० रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले.याशिवाय एमएच-०७-एव्ही-९७७९ क्रमांकाची टीव्हीएस ज्युपिटर १२५ मोपेड (किंमत १ लाख १० हजार रुपये) तसेच १०० रुपये किमतीचा लोखंडी कोयता जप्त करण्यात आला आहे.

घटनास्थळी फॉरेन्सिक व्हॅनही पाचारण करण्यात आली होती. या प्रकरणी पोलीस हेडकॉन्स्टेबल मंगेश लक्ष्मण शिंगाडे यांनी फिर्याद दिली. त्यानुसार भारतीय न्याय संहिता २०२३ मधील कलम ३२५, २७१, महाराष्ट्र प्राणी संरक्षण कायदा १९७६ (सुधारणा २०१५) मधील कलम ५ (क), ९ (अ), भारतीय शस्त्र अधिनियम कलम ४/२५ तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम १४२ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.संशयित आरोपीविरुद्ध यापूर्वीही सावंतवाडी पोलीस ठाण्यात विविध गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली. यामध्ये मारामारी, धमकी, विनयभंग आदी प्रकरणांचा समावेश आहे. तसेच २०२५ मध्ये गोवंशीय मांसासंदर्भातही त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल असल्याचे पोलिसांनी नमूद केले.या प्रकरणाचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक हिंगे करीत आहेत. परिविक्षाधीन उपविभागीय पोलीस अधिकारी दीपक शेलार, पोलीस निरीक्षक राजेंद्र मगदूम व सपोनि. हिंगे यांनी घटनास्थळी भेट दिली. आरोपीच्या अटकेची प्रक्रिया सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.


Spread the love

Related posts

‘पुणे इसिस मॉड्यूल’ प्रकरणातील सहाव्या आरोपीला अटक, सहाही आरोपी धर्मांध !

news

ग्राहक बनून आले अन् अडीच लाखांचा नेकलेस केला लंपास..! पणजी पोलिस स्थानकात तक्रार दाखल

news

MNS चा डान्स बारविरुद्ध तीव्र आक्रमण: १९ जुलैपासून अनिश्चितकालीन अन्नत्याग आंदोलन

प्रसाद परब

Leave a Comment