स्टोरी

कविवर्य दीपक तळवडेकर राज्यस्तरीय समाज वैभव पुरस्काराने ओझर, नाशिक येथे सन्मानीत.

Spread the love

नाशिक: बी.एस.एफ.बहुउद्देशीय संस्था अमरावती,संत कबीर बहुउद्देशीय संस्था बुलढाणा व उपेक्षित नायक न्युज यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित शब्दांच्या पलीकडे राज्यस्तरीय काव्यसंमेलन व समाज वैभव पुरस्कार सोहळा आजीचं पुस्तकांचे हॉटेल ओझर, नाशिक येथे नुकताच संपन्न झाला.या कार्यक्रमाचे अध्यक्ष जेष्ठ साहित्यिक राष्ट्रपती पुरस्कार विजेते मा. अशोक कुमावत यांच्या अध्यक्षतेखाली तसेच ज्येष्ठ समाजसेविका ज्योती लोहार, खानदेश प्रसिद्ध निवेदिका साहित्यिका कांचन जाधव अहिल्यानगर, साहित्यिक सुहास टिपरे संमेलनाचे आयोजक कवी भूषण सरदार ,साहित्यिका अश्विनी सांगळे ,प्रसिद्ध साहित्यिका सुमनताई मुठे ,कुमारी पौर्णिमा झाल्टे सुप्रसिद्ध अभिनेत्री छत्रपती संभाजीनगर यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला. या पुरस्कार वितरण व राज्यस्तरीय काव्य संमेलन सोहळ्यामध्ये कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय अशोक लक्ष्मण कुमावत साहित्यिक राष्ट्रपती पुरस्कार विजेते यांच्या हस्ते “अनुत्साहाच्या वातावरणाच्या काळात” या काव्यसंग्रहाचे कवी दीपक तळवडेकर सिंधुदुर्ग यांना राज्यस्तरीय समाजवैभव पुरस्कार प्रदान करण्यात आला हा पुरस्कार कवी दीपक तळवडेकर यांना त्यांच्या साहित्यिक शैक्षणिक सामाजिक कार्याचा सन्मान करण्यासाठी देण्यात आला .यावेळी राज्यस्तरीय कवी संमेलन संपन्न झाले या कवी संमेलनामध्ये महाराष्ट्रातील ६० हून अधिक कवींनी कविता सादर केल्या या कवी संमेलनामध्ये कवी दीपक तळवडेकर यांनी ‘प्रज्ञासूर्या , ही सामाजिक आशयाची कविता सादर करून मान्यवरांची दाद मिळवली.

अध्यक्षीय मार्गदर्शन करताना ज्येष्ठ साहित्यिक माननीय अशोक कुमावत म्हणाले आज फेसबुक कविता लिहिणारे लाखो कवी आहेत. पण लोकांच्या हृदयावर कोरली जाणारी कविता लिहिणारे हाताच्या बोटावर आहेत कविता ही प्रयोगशाळेत बनत नाही तर ती जीवनाच्या संघर्षातून जन्म घेते कविता कशी असावी याचे उदाहरण देत ते म्हणाले कवितेला गंध असावा मातीचा शब्दांना धार असावी तलवारीची आणि आशयाला उंची असावी आकाशाची तरच ती कविता इतिहासात अमर होते. त्यांच्या या वक्तव्याने सभागृहात एकच टाळ्यांचा कडकडाट झाला या संमेलनाचे उद्घाटन खानदेश प्रसिद्ध समाजसेविका अभिनेत्री सुप्रिया आहेर यांनी केले .प्रमुख पाहुणे नाशिकचे ज्येष्ठ साहित्यिक श्री सुहास टिपरे ,महाराष्ट्र शासन पुरस्कार विजेत्या भिमाबाई जोंधळे ,संभाजीनगर येथील सेलिब्रेटी अभिनेत्री पौर्णिमा झाल्टे ,समाजसेविका ज्योती आहेर ,प्रसिद्ध निवेदिका कांचन जाधव ,सागर निकाळे यांनी उपस्थित कविंना प्रेरणा देणारे मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाच्या आयोजन भूषण सरदार यांनी केले तसेच कार्यक्रमाचे प्रास्ताविक भूषण सरदार यांनी केले तसेच कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कवयित्री आश्विनी सांगळे यांनी केले. या कार्यक्रमांमध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्यांना राज्यस्तरीय समाज वैभव पुरस्कार देऊन गौरव करण्यात आले. सहभागी सर्व कविना प्रमाणपत्र आणि सन्मानचिन्ह देण्यात आले काव्य ,सन्मान आणि प्रेरणा यांचा त्रिवेणी संगम ठरलेल्या या संमेलनाची सांगता राष्ट्रगीताने झाली.


Spread the love

Related posts

“SIR” नावाचा नॅशनल गेम…! विद्यार्थी शिक्षकांना, शिक्षक पालकांना व पालक शोधत आहेत माय- बापांना?

प्रसाद परब

विशेष सहाय्य योजनेतील लाभार्थ्यांना उत्पन्नाचा दाखला सादर करण्याबाबत!

news

कुडाळ आगारासाठी १० तर मालवण आगारासाठी ४ नवीन एसटी गाड्या मिळणार!

news

Leave a Comment