स्टोरी

कोकण मराठी साहित्य परिषद सिंधुदुर्गची नाट्यशाखा समिती जाहीर.

Spread the love

सावंतवाडी: कोकण मराठी साहित्य परिषद ही नाट्य शाखा स्थापन करण्यात आली आहे.केंद्रीय कार्य करण्यात हा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार सिंधुदुर्ग जिल्ह्यातील चार कलाकारांचा समावेश करण्यात आला आहे. जिल्हा कार्यकारणीच्या बैठकीत या चारही कलाकारांची नावे घोषित करण्यात आली आणि त्यांचा सन्मान करण्यात आला. को म सा प चे केंदीय कार्याध्यक्ष तसेच महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळ उपाध्यक्ष , नाटककार श्री प्रदीप ढवळ यानी को.म. सा. प. सिंधुदुर्गची नाट्यशाखा समिती जाहीर केली. या समितीवर श्री. अभय खडपकर कणकवली, सौ. वर्षा वैद्य कुडाळ , श्री संजय शिंदे, मालवण आणि अभिनेते दिग्दर्शक श्री. बाळ पुराणिक, सावंतवाडी यांची निवड करण्यात आली. १७५ वर्षांची परंपरा असलेली संगीत नाट्यकला जोपासण्याचे कार्य श्री बाळ पुराणिक करीत आहेत. तसेच येथील वर्षा वैद्य या नाटक कलाकार म्हणून त्यांनी अनेक बालनाट्य तसेच विविध नाटकांमध्ये विविध भूमिका साकारल्या आहेत.एकांकिका स्पर्धेमध्ये त्यांनी या संपादन केले आहे. त्याचबरोबर संजय शिंदे हे नाट्य दिग्दर्शक लेखक कलाकार म्हणून काम करत आहेत. तर अभय खडक कर यांनी नाट्य चित्रपट आणि विविध क्षेत्रात सिंधुदुर्ग जिल्ह्याचा ठसा उमटवला आहे हे खरोखरच कौतुकास्पद आहे. त्यांच्या या कार्यात को म सा प सर्व प्रकारे सहकार्य करेल. अशी ग्वाही देत श्री ढवळ यानी दिली. यावेळी कोमसाप जिल्हाध्यक्ष श्री. मंगेश मस्के, जिल्हा कार्यवाह ॲड. श्री. संतोष सावंत , श्री. रुजारिओ पिंटो, खजिनदार अनंत वैद्य श्री. अभिमन्यू लोंढे, सहसचिव सुरेश पवार, संतोष वालावलकर, दिपाली काजरेकर, वृंदा कांबळी संदीप वालावलकर, अन्य पदाधिकारी,सदस्य उपस्थित होते. यावेळी या नाट्यशाखेच्या समितीवर निवड झालेल्या वर्षावैद्य व बाळ पुराणिक यांचा सत्कार करण्यात आला.


Spread the love

Related posts

सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठान कडून रामदास गवळीला जीवदान….!

news

राजा शिवाजी चौक (गवळी तिठा) येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य- दिव्य अश्वारूढ पुतळा उभारणार..! माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर

प्रसाद परब

जिल्हास्तरीय बुदधिबळ स्पर्धेत बाळकृष्ण पेडणेकर, विभव राऊळ, चिदानंद रेडकर, दिप स्वार विजेते!

news

Leave a Comment