स्टोरी

आदिवासींच्या समस्या शिक्षणातून सुटतील..! प्रा.एल. एम.वळवी

Spread the love

जळगाव जिल्हा प्रतिनिधी( हमीद तडवी):

रावेर येथील श्री.व्ही.एस.नाईक कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात जागतिक आदिवासी दिन साजरा करण्यात आला.विद्यार्थी विकास विभाग आणि राष्ट्रीय सेवा योजना विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने व्याख्यानाचा कार्यक्रम घेण्यात आला. प्रा.एल.एम.वळवी यांनी आदिवासी संस्कृती,बोलीभाषा,परंपरा याविषयी मार्गदर्शन केले.त्यांनी आपल्या भाषणात सांगितले की,जगभरातील आदिवासी संस्कृती जतन व्हावी.आदिवासी समाजाच्या विविध परंपरा निसर्गाशी अनुरूप आहेत.माणसाच्या शाश्वत विकासासाठी निसर्गाचे रक्षण करणं हे आदिवासी समाज आपलं कर्तव्य मानतो.जल,जंगल,जमीन यासाठीचा संघर्ष आजही सुरू आहे.जगभरामध्ये आदिवासींच्या हक्कांचे हाणन होत आहे.यासाठी आदिवासींनी जन चळवळ उभारावी.आदिवासींचे प्रश्न आणि समस्या शिक्षणातून सुटू शकतात.शिक्षणासाठी आदिवासी समाजातील नवे नायक पुढे आले पाहिजेत.शिक्षण हीच आदिवासींसाठी गुरुकिल्ली आहे.शिक्षणामुळे आदिवासींचे सर्व प्रश्न समस्या सुटतील.असे आव्हान आपल्या भाषणातून प्राध्यापक एल.एम.वळवी यांनी केले.

जननायक बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.उपप्राचार्य प्रा.डॉ.एस.डी.धापसे हे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. त्यांनी अध्यक्षीय भाषण केले.विद्यार्थी विकास अधिकारी डॉ.जी.आर.ढेंबरे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले.सूत्रसंचालन प्राध्यापक सागर महाजन यांनी केले.आभार प्रदर्शन प्राध्यापक तेजस दसनूरकर यांनी केले.या कार्यक्रमाला महाविद्यालयातील प्रा.सी.पी.गाढे,आय.क्यू.सी. समन्वयक डॉ.बी.जी.मुख्यदल, प्रा.तेजस दसनूरकर तसेच महाविद्यालयातील विद्यार्थी उपस्थित होते.या कार्यकमाच्या यशस्वीतेसाठी शिक्षकेत्तर कर्मचारी श्री.सुनिल मेढे,श्री. जयेश बढे यांनी प्रयत्न केले.


Spread the love

Related posts

झेंडावंदनाची यादी जाहीर!

news

मुणगे हायस्कूलमध्ये ‘जागतिक योग दिन’ बहारदार प्रात्यक्षिकांनी साजरा….

news

भारताकडून पाकिस्तान वर ९ ठिकाणी मिसाईल हल्ला..!

news

Leave a Comment