मनोरंजन

भाऊ कदम आणि गौतमी पाटीलची ‘हिल पोरी हिला’ जोडी सुपरहिट! दादा कोंडकेंच्या अजरामर गाण्यावर झक्कास डान्स, लेकीची खास प्रतिक्रिया चर्चेत

Spread the love

मुंबई | महाराष्ट्र न्यूज नेटवर्क : मराठी मनोरंजन विश्वात नवी धमाल सादर झाली आहे. लोकप्रिय विनोदवीर भाऊ कदम आणि नृत्यांगना- अभिनेत्री गौतमी पाटील यांची पहिल्यांदाच एकत्र जोडी ‘हिल हिल पोरी हिला’ या गाण्यातून प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. दिग्गज कलावंत दादा कोंडके यांच्या ५२ वर्ष जुण्या सदाबहार गाण्याचा हा रिमेक प्रेक्षकांना इतका भावला की, तो सुपरहिट ठरला आहे. कोकणातील निसर्गरम्य समुद्रकिनाऱ्यावर चित्रीत झालेल्या या म्युझिक व्हिडिओत भाऊ कदम दादा कोंडकेंच्या लूकमध्ये दिसत आहेत, तर गौतमी पाटील नऊवारी साडीतील आकर्षक अंदाजात नृत्य सादर करते. दोघांची केमिस्ट्री, जोशीदार नृत्य आणि पारंपरिक गाण्याचा नवीन जलवा पाहून प्रेक्षक ‘वाह’ म्हणत आहेत. गाणे Saregama Marathi वर उपलब्ध झाल्यापासून सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.विशेष म्हणजे, भाऊ कदम यांच्या मुलीने मृण्मयी कदम यांनी वडिलांचा हा डान्स पाहून दिलेली खास कमेंट प्रेक्षकांच्या मनात घर करून गेली. “आरं जा जा तू ‘मुला’…” अशा शब्दांत तिने विनोदी प्रतिक्रिया दिली, जी आता मोठ्या प्रमाणात शेअर होत आहे. या कमेंटमुळे गाण्याला आणखी मजेदार आणि कौटुंबिक टच मिळाला आहे.मराठी इंडस्ट्रीत प्रथमच पाहायला मिळालेल्या या अनोख्या जोडीने प्रेक्षकांना पूर्णपणे खिळवून ठेवले आहे. एकीकडे गौतमीची ऊर्जेने भरलेली लावणी स्टाइल नृत्य, तर दुसरीकडे भाऊ कदम यांचा सहज विनोद आणि अभिनय – या सर्वांचा संगम ‘हिल पोरी हिला’ ला वेगळी ओळख देतो.

प्रेक्षकांचे मत : “दादांचं गाणं नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्याचे उत्तम काम. भाऊ-गौतमी जोडी खरोखर सुपरहिट!”हा गाण्याचा व्हिडिओ पाहण्यासाठी प्रेक्षकांना Saregama Marathi च्या युट्यूब चॅनेलवर जाण्याचे आवाहन करण्यात येत आहे. मराठी संगीत आणि नृत्यप्रेमींसाठी ही खास भेट ठरली आहे!


Spread the love

Related posts

सनी लियोनचा नवा मराठी धमाका! शांताबाई रिमिक्स गाण्याने प्रेक्षकांचे लक्ष वेधले 

प्रसाद परब

कैलाश खेर यांनी भस्म आरतीत घेतला भाग, महाकालच्या चरणी केली नमन

प्रसाद परब

Jay Jay Swami Samarth : स्वामी समर्थांच्या कृपेने गायत्री बनून गंगा येणार, गोवर्धनला मिळणार कर्मांची शिक्षा!

प्रसाद परब

Leave a Comment