पनवेल | महाराष्ट्र न्यूज नेटवर्क – कोणतीही पूर्वसूचना किंवा लाऊडस्पीकरवर घोषणा न देता वाहने उचलण्याचे प्रकार पनवेलमध्ये सुरू असल्याने सामान्य नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. नियमांचे उल्लंघन करत होणाऱ्या या कारवाईमुळे वाहनमालकांना आर्थिक नुकसान आणि मानसिक त्रास सहन करावा लागत आहे.सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका व्हिडिओत दिसते की, व्हिडिओ काढण्यास सुरुवात होताच स्थानिक अधिकारी सुनील शिंदे खास गाडीतून उतरले आणि उचललेली वाहन सोडून दिली. नियमानुसार कारवाई योग्य असती तर व्हिडिओ काढल्यावर अचानक निर्णय का बदलला, असा प्रश्न उपस्थित होत आहे.नागरिकांचा आरोप आहे की, जागेवर फोटो काढून दंड आकारण्याऐवजी विनाकारण गाड्या उचलून नुकसान करणे आणि नंतर सोडवण्यासाठी अनधिकृत पैसे उकळण्याचा प्रकार सुरू आहे. “वाहतूक शिस्तीच्या नावाखाली नागरिकांना हैराण करणे आणि आर्थिक फायदा घेणे” हा हेतू असल्याची भावना अनेकांमध्ये निर्माण झाली आहे.
नागरिकांचा सवाल : अशा अनधिकृत आणि अपारदर्शक कारवाईची पारदर्शक चौकशी कधी आणि कोण करणार? सामान्य माणूस आपला न्याय मागायचा तरी कुणाकडे?पनवेल महानगरपालिका आणि वाहतूक विभागाने याबाबत तातडीने स्पष्टीकरण द्यावे आणि प्रक्रिया पारदर्शक करावी, अशी मागणी जोर धरत आहे.
