मुंबई : गुन्हे प्रकटीकरण शाखा कक्ष ४ च्या पोलिसांनी दिलेल्या सातत्यपूर्ण आणि कौशल्यपूर्ण कारवाईत तेलंगणातील जहिराबाद येथे उभारण्यात आलेला एमडी (MD) ड्रगचा मोठा कारखाना पूर्णपणे उद्ध्वस्त करण्यात आला आहे.दिनांक ०४ एप्रिल २०२६ रोजी मिरारोड येथील एका घरातून १ किलो ३२४ ग्रॅम एमडी ड्रग जप्त करण्यात आल्यानंतर या प्रकरणाचा तपास अधिक गतीने सुरू करण्यात आला. या तपासात गुन्हे प्रकटीकरण शाखेने १५ आरोपींना आधीच अटक केली होती. आता आरोपी क्र. १६ संदीप विरास्वामी नायडू, आरोपी क्र. १७ नसिर ऊर्फ बाबा जानिमीया शेख आणि आरोपी क्र. १८ मेहमुद मेहबूब खान यांना अटक करण्यात आली.तपासात उघडकीस आले की, आरोपी नसिर ऊर्फ बाबा याने तेलंगणा राज्यातील संगारेड्डी जिल्ह्यातील पिचारगडी तांडा, ता. जहिराबाद येथे २ एकर जमिनीवर फार्म हाऊसमध्ये अत्याधुनिक एमडी ड्रग उत्पादन कारखाना उभारला होता. या ठिकाणी ३ किलो एमडी ड्रग आणि ड्रग तयार करण्यासाठी लागणारे Chloroform, Acetone, Monomethylamine, Hydrochloric Acid व 2-Bromo सारखे नियंत्रित रसायन २२९३ लिटर प्रमाणात जप्त करण्यात आले. यासह ड्रग उत्पादनाचे संपूर्ण लॅब साहित्यही हस्तगत करण्यात आले.एकूण जप्ती : या गुन्ह्यात आतापर्यंत २०.७२ कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.या उत्कृष्ट कामगिरीबद्दल पोलिस आयुक्त श्री. निकेत कौशिक, अपर पोलिस आयुक्त श्री. दत्तात्रय शिंदे, उप आयुक्त श्री. संदीप डोईफोडे, सहायक पोलिस आयुक्त श्री. मदन बल्लाळ यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण शाखा कक्ष ४ च्या अधिकाऱ्यांनी उल्लेखनीय कामगिरी बजावली. प्रभारी पोलिस निरीक्षक प्रमोद बडाख, उपनिरीक्षक प्रशांत गांगुर्डे व त्यांच्या टीमने ही मोहीम यशस्वी केली.या कारवाईमुळे मुंबई-ठाणे परिसरात एमडी ड्रगचा पुरवठा करणाऱ्या आंतरराज्यीय रॅकेटला मोठा धक्का बसला असून, युवकांना ड्रग्सच्या विळख्यातून वाचवण्यासाठी ही कारवाई महत्त्वाची ठरली आहे. अधिक तपास सुरू आहे.
मिरारोड ड्रग रॅकेटचा मोठा स्फोट! तेलंगणातील एमडी ड्रग कारखाना उद्ध्वस्त
previous post
