सावंतवाडी (रवी जाधव): राजा शिवाजी चौक (गवळी तिठा) येथे गुढीपाडव्या निमित्त सालाबाद प्रमाणे सत्यनारायणाच्या महापूजेचे आयोजन केले जाते. त्या प्रसंगी विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे हि आयोजन केले जाते या कार्यक्रमाच्या प्रसंगी माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी राजा शिवाजी चौक (गवळी तीठा) येथे लवकरच लोकवर्गणीतून भव्य – दिव्य अश्वारूढ छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारणार असल्याची घोषणा केली आहे. प्रदेशाध्यक्ष रवींद्रजी चव्हाण व पालकमंत्री नितेशजी राणे यांची लवकरच भेट घेऊन हा प्रस्ताव त्यांच्यासमोर ठेवून त्यानंतर सर्व शिवप्रेमींना एकत्र करून कमिटी स्थापन केली जाईल. ही शुभ वार्ता ऐकताच कार्यक्रमाला उपस्थित प्रेक्षकांनी एकच टाळ्यांचा गडगडात केला. मंडळाचे अध्यक्ष बंटी माठेकर, रवी जाधव, उपाध्यक्ष दिलीप पवार बंड्या तोरस्कर, सचिव दीपक सावंत, महादेव राऊळ यांनी हा प्रस्ताव एकमताने साळगावकर यांच्यासमोर ठेवला होता. त्यामुळे या पवित्र विषयाला दिशा देण्याचे काम बबन साळगावकर यांनी केले आहे. त्यामुळे मंडळाच्या सर्व कार्यकर्त्यांनी त्यांचे मनःपूर्वक आभार मानले आहेत.या प्रसंगी ज्येष्ठ पत्रकार व सकल मराठा व हिंदू समाजाचे जिल्हाध्यक्ष सिताराम गावडे यांनी यासाठी ताकतीने कामाला लागून पूर्ण सहकार्य केले जाईल. असे सांगितले तर नवनिर्वाचित प्रभारी नगराध्यक्ष ऍड.अनिल यांनीही मदत करू असे आश्वासन दिले.
या प्रसंगी राजा शिवाजी चौक मित्र मंडळाचे सल्लागार बबन साळगावकर, नगराध्यक्ष ऍड.अनिल निरवडेकर, उपनगराध्यक्ष अन्नपूर्णा कोरगावकर,ज्येष्ठ पत्रकार सिताराम गावडे, रोटरी क्लब अध्यक्ष तथा स्वीकृत नगरसेवक ऍड सिद्धार्थ भांबुरे, यशवंत देसाई, विजय सावंत,अध्यक्ष बंटी माठेकर, उपाध्यक्ष बंड्या तोरस्कर, उपाध्यक्ष दिलीप पवार, उपाध्यक्ष अरुण घाडी, सचिव दिलीप पवार, सहसचिव महादेव राऊळ, प्रसिद्धी प्रमुख रवी जाधव, मनोज घाटकर, सत्यम सावंत,नगरसेविका दिपाली भालेकर, माजी नगरसेवक सुरेश भोगटे, विलास जाधव, संजय पेडणेकर, प्रदीप भालेकर, दिलीप भालेकर, मनोज राऊळ, वासुदेव खानोलकर, संजय साळगावकर, सुंदर गावडे, शुभम मळकाचे उपस्थित होते.
