Uncategorized

कोकण मराठी साहित्य परिषदेच्या वतीने मधुभाई साहित्य समाज कृतज्ञता सोहळ्याचे आयोजन.

Spread the love

सावंतवाडी प्रतिनिधी: कोकण मराठी साहित्य परिषद ची जिल्हा कार्यकारणीमंडळाची बैठक रविवारी संपन्न झाली. या बैठकीत कोकण मराठी साहित्य परिषदेचेसंस्थापक अध्यक्ष तथा पद्मश्री मधु मंगेश कर्णिक यांचा महाराष्ट्र शासन मराठी भाषा विभागव जिल्हा रत्नागिरी तसेच कोकण मराठी साहित्य परिषदेच्या वतीने मधुभाई साहित्य समाज कृतज्ञता सोहळा, नागरी सत्कार व प्रकट मुलाखत कार्यक्रम येत्या शनिवारी १४ फेब्रुवारी रोजी रत्नागिरी येथे स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर नाट्यगृह येथे सायंकाळी चार वाजता आयोजित करण्यात आला आहे. या समारंभाला सिंधुदुर्ग जिल्ह्यातून जवळपास १०० हून अधिक साहित्यिक व कोकण मराठी साहित्य परिषदेचे पदाधिकारी सदस्य सहभागी होणार आहेत. असे नियोजन बैठकीत करण्यात आले आहे. कोकण मराठी साहित्य परिषद सिंधुदुर्ग मंडळाची कार्यकारणी बैठक अध्यक्ष मंगेश मस्के यांच्या अध्यक्षतेखाली झाली.

यावेळी १४ फेब्रुवारी रत्नागिरी येथे होणाऱ्या कार्यक्रमाच्या नियोजनाबाबत चर्चा करण्यात आली. यावेळी सर्वप्रथम जिल्हा सचिव ऍड. संतोष सावंत यांनी बैठकीचे नियोजनासंदर्भात माहिती करून दिली.मागील इतिवृत्ताचे वाचनास मंजुरी देण्यात आली. त्यानंतर अध्यक्ष मंगेश मस्के यांनी स्पष्ट केले. पद्मश्री तथा कोकण मराठी साहित्य परिषदेचे संस्थापक अध्यक्ष मधुमंगेश कर्णिक यांचा नागरिक सत्कार होणार आहे. या कार्यक्रमाला सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी, दोडामार्ग, कुडाळ, वेंगुर्ले, मालवण, कणकवली, वैभववाडी, देवगड आदी भागातून जवळपास शंभरहून अधिक साहित्यिक व प्रेमी तसेच सदस्य पदाधिकारी मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत. हा क्षण कोकण साठी आणि सिंधुदुर्ग वास यासाठी फार मोठा आहे. त्यामुळे सिंधुदुर्गातील साहित्यप्रेमी यांनी मोठ्या संख्येने या कार्यक्रमाला उपस्थित राहावे असे आवाहन त्यांनी केले.

यावेळी ते म्हणाले येत्या २७ फेब्रुवारीची मराठी भाषा दिन साजरा होणार आहे. प्रत्येक तालुक्याने आपापल्या भागात मराठी भाषा दिन साजरा करावा. जिल्हा मंडळातर्फे सावंतवाडी किंवा कुडाळ येथे मोठ्या प्रमाणात मराठी भाषा दिन साजरा केला जाणार आहे आणि तसा उपक्रम आयोजित करण्यात येणार आहे.असे त्यांनी स्पष्ट केले. या बैठकीला जिल्हा कार्य करणे मंडळाचे सदस्य वृंदा कांबळी, संतोष वालावलकर, कणकवली तालुकाअध्यक्ष कदम, जिल्हा प्रसिद्धीप्रमुख गणेश जेठेप्रांत, सदस्य रूजारिओ पिंटो, तालुकाध्यक्ष सुरेश ठाकूर, सावंतवाडी तालुकाध्यक्ष दीपक पटेकर, जिल्हा मंडळाचे जनसंपर्क प्रतिनिधी भरत गावडे, कणकवली तालुक्याचे सचिव आधी उपस्थित होते. यावेळी उपस्थितां चे आभार जिल्हा सचिव ऍड.संतोष सावंत यांनी मानले.


Spread the love

Related posts

काँग्रेसमध्ये पार्ट2? कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम’, थोरात-पटोले वादावर नवं ट्विट, हायकमांड काय निर्णय घेणार?

प्रसाद परब

🚩मराठी राजभाषा दिन🚩

news

पुण्यातील फरासखाना पोलीस ठाण्यातील महिला हवालदार मनिषा पुकाळे हिचे पुणे बुधवार पेठेशी थेट संबंध.

प्रसाद परब

1 comment

प्रसाद परब February 11, 2026 at 4:19 pm

खूप सुंदर

Reply

Leave a Comment