स्टोरी

वेर्ले गावात भव्य वारकरी दिंडी सोहळ्याचे आयोजन..!

Spread the love

सावंतवाडी (वेर्ले): श्री देवी पवणाई रावळनाथ हरिनाम सप्ताह निमित्त व सफला एकादशीचे पावन औचित्य साधून श्री हेळेकर उत्कर्ष मंडळ, वेर्ले – पैलाडवाडीच्या वतीने १५ डिसेंबर २०२५ रोजी सायंकाळी ७ वाजता भव्य वारकरी दिंडी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. या वारकारी दिंडी सोहळ्याची सुरुवात वारकरी, संत वेशात सजून टाळ, मृदुंगाच्या गजरात “माऊली माऊली”, “ज्ञानोबा- तुकाराम” अशा गजरात होणार आहे. हा वारकरी दिंडी सोहळा वेर्ले -पैलवाडी ते श्री देवी पावणाई रावळनाथ मंदिर, वेर्ले या मार्गावर रंगणार आहे.

 

या भव्य वारकरी दिंडी सोहळ्यामध्ये भाविकांना विठ्ठल रखुमाई दर्शन, संत तुकाराम, संत ज्ञानेश्वर, संत जनाबाई, साईबाबा आणि इतर आकर्षक वेशभूषा बघायला मिळणार आहेत. तसेच बैलगाडी हि या सोहळ्याचे खास आकर्षण असणार आहे. तरी सर्व भाविक, वारकरी आणि ग्रामस्थांनी दिंडी सोहळ्यात सहभागी होऊन ह्या विलक्षण क्षणाचे व्हावे असे आवाहन श्री हेळेकर उत्कर्ष मंडळ, वेर्ले – पैलाडवाडीच्या वतीने करण्यात आले आहे.


Spread the love

Related posts

मसदे वडाचापाट श्री स्वामी समर्थ मठ येथे १९ ऑगस्ट रोजी धार्मिक कार्यक्रम!

news

जि. प. पूर्ण प्राथमिक शाळा वेरली शाळेचा शतकोत्तर हिरक महोत्सव ४ मे ते ६ मे रोजी संपन्न होणार

news

वैश्यवाणी समाजाच्या ओबीसी प्रश्नावर महत्त्वपूर्ण यश.

प्रसाद परब

Leave a Comment