स्टोरी

अक्कलकोट श्री.स्वामी समर्थांच्या चरणी लावण्यात आला ५६ प्रकारच्या महाप्रसादाचा भोग…! पुण्यातील श्री स्वामी समर्थ सेवासार संघाची सेवा.

Spread the love

अक्कलकोट  प्रतिनिधी: श्री दत्त जयंतीचे औचित्य साधून पुण्यातील श्री स्वामी समर्थ सेवासार संघाच्या वतीने २१ किलोचा केक अक्कलकोट श्रीं स्वामी समर्थ चरणी अर्पण करण्यात आला. श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरात शनिवारी पहाटे काकड आरतीनंतर मंदिर समितीचे चेअरमन व नगरसेवक महेश इंगळेंच्या मार्गदर्शनाखाली प्रथमेश इंगळे व अजय कोदमूर यांच्या हस्ते हा केक कापून आनंदोत्सव साजरा करण्यात आला. या प्रसंगी बोलताना महेश इंगळे यांनी श्री स्वामी समर्थांचे आद्य अवतार श्री दत्तात्रय महाराज असल्याने येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरात दत्त जन्मोत्सव सोहळा हा नेहमीच मोठ्या भक्ती भावाने व उत्साहाने साजरा होत असतो. भाविकही या सोहळ्यामध्ये मोठ्या भक्ती भावाने सहभागी होत असतात. हा केक कापून आनंदोत्सव साजरा करणे त्याचाच एक भाग आहे.

 

तसेच श्री स्वामी समर्थ महाराजां कडून गुरु शिष्य परंपरेचा उद्देश मिळण्यात अहोभाग्य ज्यांना लाभलं ते स्वामीसूत महाराज यांना यावर्षी गुरु शिष्य परंपरेचा उपदेश घेऊन परंपरेच्या अविरत प्रसार कार्याला तब्बल १५० वर्षे पूर्ण होत असल्याचे औचित्य साधून प्रथमेश इंगळे तसेच जीवन मानकर, अजय (महाराज) कोदमूर यांच्या शुभहस्ते केक कापण्यात आला आहे.

श्री दत्तजयंती उत्सवाच्या निमीत्ताने आज जगन्नाथपुरीचा प्रसाद, ड्रायफ्रूट लाडू, तसेच दशमी अशा विविध स्वरूपामध्ये महाप्रसादाचा भोग श्रींना दाखवण्यात आला असल्याची माहिती महेश इंगळे यांनी दिली. देवस्थानचे सचिव आत्माराम घाटगे, विश्वस्त महेश गोगी, व्यंकटेश पुजारी, स्वामी समर्थ सेवासार संघाचे सदस्य, स्वामीभक्त संजय पवार, गिरीश पवार, विपुल जाधव, श्रीकांत मलवे, भिमा मिनगले, काशिनाथ इंडे, श्रीशैल गवंडी, दर्शन घाटगे, तुषार मोरे, आदींसह स्वामीभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.


Spread the love

Related posts

मसुरे येथील नेत्र चिकित्सा शिबिराचा १३० जणांना लाभ…! १०४ जणांना मोफत चष्म्या वाटप

news

कालावल खाडीपात्रातील अनधिकृत वाळू उत्खलना विरोधात खोत जुवा बेटावरील महिला आक्रमक.

news

शिक्षक भारतीच्या जिल्हाध्यक्षपदी संतोष पाताडे यांची फेरनिवड! शिक्षक भारतीची त्रैवार्षिक जिल्हा कार्यकारणी जाहीर . 

news

Leave a Comment