स्टोरी

श्री गवळदेव देवस्थान ट्रस्ट च्या वतीने श्रीकृष्ण दिनदर्शिकचे प्रकाशन संपन्न.

Spread the love

सावंतवाडी प्रतिनिधी: श्री गवळदेव देवस्थान ट्रस्ट धार्मिक, सामाजिक उपक्रम राबवित असतानाच चालू वर्षी श्रीकृष्ण दिनदर्शिका 2026 हा नावीन्यपूर्ण उपक्रम हाती घेतला. या दिनदर्शिकेचे प्रकाशन शुक्रवार दि 5 डिसेंबर रोजी गावचे प्रमुख मानकरी श्री बाबा गावकर व कु शुभम गावकर यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. या उपक्रमासाठी जाहिरातदारांचा उदंड प्रतिसाद मिळाला.

या कार्यक्रमासाठी तंटामुक्ती अध्यक्ष श्री शंकर मेस्त्री, गवळी समाजाचे मानकरी श्री विलास गवळी, श्री नारायण भालेकर, श्री सिताराम गवळी, श्री अनंत झिडगे, ट्रस्ट चे अध्यक्ष श्री महेंद्र गवळी, पोलीस पाटील प्रदीप केळूसकर ग्रामपंचायत सदस्या सौ. भाग्यश्री भारमल मा पंचायत समिती सदस्या प्राजक्ता केळूसकर तसेच सचिव योगेश गवळी विश्वस्त श्री भालचंद्र भारमल, श्री नामदेव गवळी, साईनाथ हनपाडे मेजर सुभेदार लक्ष्मण गवळी, प्रकाश गवळी व मोठ्या संख्येने गवळी बांधव महिला उपस्थित होते.

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ट्रस्ट चे उपाध्यक्ष श्री बाबुराव भालेकर यांनी केले प्रस्ताविक श्री प्रदीप केळुस्कर आभार अध्यक्ष महेंद्र गवळी यांनी मानले


Spread the love

Related posts

मुंबईत छत्रपती शिवाजी महाराजांच्‍या जीवनावर आधारित भव्‍य संग्रहालय उभारणार ! सुधीर मुनगंटीवार, सांस्‍कृतिक कार्यमंत्री.

news

कोमसाप शाखा सावंतवाडी च्या वतीने कवी दादा मडकईकर यांचा सत्कार होणार…!

news

मसुरे केंद्रशाळा वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न….!

news

Leave a Comment