स्टोरी

आरोस गावचे रहिवासी राजन धोंडू पटेकर यांचे अल्पशा आजाराने निधन.

Spread the love

मळगाव:  आरोस गावचे सुपुत्र व गेली बरीच वर्षे मळगाव येथे वास्तव्यास असलेले राजन धोंडू पटेकर (वय ६५) यांचे मंगळवारी पहाटे ५.०० वाजता सावंतवाडीतील खाजगी रुग्णालयात अल्पशा आजाराने निधन झाले. आरोग्य विभाग, पंचायत समिती, सावंतवाडी मधून विस्तार अधिकारी या पदावरून ते सेवानिवृत्त झाले होते.

गेले चार दिवस त्यांना सर्दी खोकल्याचा त्रास होत होता. परंतु सोमवारी सायंकाळी त्यांची तब्बेत जास्तच खालावल्याने त्यांना सावंतवाडी येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांच्यावर उपचार सुरू असताना पहाटे ५.०० वाजण्याच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली. मंगळवारी दुपारी त्यांच्या पार्थिवावर मळगाव येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगे धनराज उर्फ अमेय व गौरव, सुना असा परिवार आहे.


Spread the love

Related posts

मुलांच्या भवितव्यासाठी सावंतवाडी टर्मिनस होणे अत्यंत महत्त्वाचे:- केतन सावंत विद्यार्थी सेना जिल्हाअध्यक्ष

news

काजू बीच्या घटलेल्या दराबाबत बागायतदारांनी पुकारलेल्या धरणे आंदोलनास युवराज लखम सावंत भोसले देणार पाठिंबा…!

news

पावशी सर्व्हिस रोड व बस थांब्या संदर्भात महिन्याभरात निर्णय घ्या अन्यथा ठिय्या आंदोलन

news

Leave a Comment