स्टोरी

पत्रकारांच्या मुलांसाठी शैक्षणिक किट वाटप समारंभाचे आयोजन.

Spread the love

सावंतवाडी: ‘व्हॉईस ऑफ मीडिया – सिंधुदुर्ग’ परिवाराच्या वतीने तसेच कोकण कला व शिक्षण विकास संस्थेच्या विशेष सहकार्याने पत्रकारांच्या मुलांसाठी शैक्षणिक किट वाटप समारंभाचे आयोजन करण्यात आले आहे. हा उपक्रम उद्या  शनिवार, दिनांक १८ ऑक्टोबर रोजी सकाळी १०.३० वाजता राणी पार्वतीदेवी हायस्कूल, सावंतवाडी येथे पार पडणार आहे.

 

 

 

या उपक्रमाला कोकण कला व शिक्षण विकास संस्थेचे अध्यक्ष दयानंद कुबल व त्यांच्या टीमचे विशेष सहकार्य लाभले असून या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून सच्चिदानंद उर्फ संजू परब (माजी नगराध्यक्ष सावंतवाडी तथा शिवसेना जिल्हाप्रमुख – शिंदे गट),विक्रांत सावंत (अध्यक्ष – शिक्षण प्रसारक मंडळ, सावंतवाडी), श्रीधर पाटील (तहसीलदार-सावंतवाडी), डॉ. ज्ञानेश्वर ऐवळे (वैद्यकीय अधीक्षक – सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालय), ॲड. सिद्धार्थ भांबुरे (अध्यक्ष – रोटरी क्लब ऑफ सावंतवाडी), कोकण कला व शिक्षण संस्थेचे प्रतिनिधी आदि मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

 

पत्रकार बांधवांच्या कुटुंबीयांना शैक्षणिक सहाय्य मिळावे, या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात येत आहे. कार्यक्रमानंतर ‘व्हॉईस ऑफ मीडिया – सिंधुदुर्ग परिवाराची’ छोटी मीटिंग देखील आयोजित करण्यात आली आहे. तरी या प्रसंगी व्हॉईस ऑफ मीडिया – सिंधुदुर्ग परिवरातील सर्व पत्रकार बांधवांना वेळेवर उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.


Spread the love

Related posts

महादेवाला हिरवी शाल घालण्याचा प्रयत्न करणार्‍यांवर कठोर कारवाई करा! महाराष्ट्र मंदिर महासंघ नाशिक

news

आ. वैभव नाईक यांनी जिल्हाधिकारी आणि कुडाळ तहसीलदार यांना धरले धारेवर

news

छत्रपती संभाजीनगर येथे स्‍वतःचे मृत्‍यू प्रमाणपत्र घेऊन महिला पोचली पंचायत समितीत!

news

Leave a Comment