स्पोर्ट

कराटे मार्शल आर्टचे नऊ विद्यार्थी ब्लॅक बेल्ट साठी पात्र.

Spread the love

सावंतवाडी प्रतिनिधी:  कुडाळ व ओरोस येथे सुरू असलेल्या ओकिनावा गोजूकान कराटे डो मार्शल आर्ट असोसिएशन सिंधुदुर्ग या संस्थेमार्फत दि. २० आणि २१ सप्टेंबर रोजी घेण्यात आलेल्या कराटे ब्लॅक बेल्ट च्या परिक्षेमध्ये नऊ विद्यार्थी उत्तीर्ण होऊन यांनी ब्लॅक बेल्ट प्राप्त केला आहे. डावीकडून १. इशांत पवार – आर पी डी ज्युनियर कॉलेज, सावंतवाडी. २. राजवर्धन ठाकूर – डॉन बॉस्को हायस्कूल, ओरोस. ३. तनमय गवस – डॉन बॉस्को ज्युनियर कॉलेज, ओरोस. ४. निलेश राऊळ – एम व्ही जे कॉलेज, सांगेली. ५. अदिती नाटलेकर – मिलाग्रीज हायस्कूल, सावंतवाडी. ६. सोहम सावंत – मिलाग्रीज हायस्कूल, सावंतवाडी. ७. सानिध्य वेल्हाळ – मिलाग्रीज ज्युनियर कॉलेज, सावंतवाडी. ८. आर्यन कदम – कुडाळ हायस्कूल व ज्युनियर कॉलेज, कुडाळ. ९. शैलेश राऊळ – एस पी के कॉलेज, सावंतवाडी.

तसेच ईतर ६० विद्यार्थ्यांनी येल्लो बेल्ट, ऑरेंज बेल्ट, ग्रिन बेल्ट, ब्लू बेल्ट व ब्राऊन बेल्ट प्राप्त केले आहेत. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहूणे म्हणून पि एस आय प्रमोद पाटील साहेब, सावंतवाडी तसेच डॉ. हंसी कॅप्टन एस सी डुराई सर 9 th डिग्री रेड बेल्ट (जापान) बेंगलोर मधून उपस्थित होते. पि एस आय प्रमोद पाटील साहेब यांनी विद्यार्थ्यांना खेळाचे महत्व आणि कराटे मधून शारिरीक तंदुरूस्ती, चपळपणा, सिस्थबध्द व खास करून महिलांसाठी स्व रक्षणाबद्दल प्रोत्साहीत केले. या सर्व विद्यार्थ्यांना श्री दिलीप बाळकृष्ण राऊळ 3 rd डिग्री ब्लॅक बेल्ट, एन एस जी कमांडो, माजी सैनिक यांचे मार्ग दर्शन लाभले.


Spread the love

Related posts

मुक्ताई ॲकेडमीचे कार्य कौतुकास्पद! – देव्या सुर्याजी.

news

मसुरे डांगमोडे येथे २९ मार्च रोजी भव्य जिल्हास्तरीय पुरुष आणि निमंत्रित महिला कबड्डी स्पर्धा.

news

राज्यस्तरीय प्रोऍक्टिव्ह अबॅकस स्पर्धेत सावंतवाडी – वेंगुर्लेतील मुलांचे उज्ज्वल यश…!

news

Leave a Comment