स्टोरी

पश्चिम महाराष्ट्र महिला पतंजली योग समितीने आयोजित केलेली ३ दिवसीय राज्यस्तरीय योग कार्यशाळा सोलापूर( वडाळा) येथे थाटामाटात संपन्न.

Spread the love

मालवण प्रतिनिधी: पश्चिम महाराष्ट्र महिला पतंजली योग समितीची राज्यस्तरीय ३ दिवसीय कार्यशाळा म्हणजे खरोखरच आरोग्यवर्धक अशी मेजवानी होती. यामध्ये वेगवेगळ्या जिल्ह्यातून अनेक योग महिला साधक सहभागी झाल्या होत्या. १४,१५ ते १६ जून २०२५ पर्यंत चाललेल्या या शिबिरात आवश्यक माहितीवर्धक सत्र घेण्यात आली. यामध्ये अध्यात्मिक नवविधा भक्ती, पतंजलीच्या रोगानुसार असलेल्या औषधांची सूची व त्याची उपयोगिता, संघटन कार्य पद्धती ,स्वदेशी जागरण, अध्यात्म विज्ञान आणि तत्त्वज्ञान यांचा असलेला परस्पर संबंध, मेडिटेशन अशा अनेक विषयांची माहिती त्या क्षेत्रातील तज्ञ मंडळींकडून देण्यात आली. आपल्या संपूर्ण निरोगीमय आरोग्यासाठी योगाचे महत्त्व आणि त्या अनुषंगाने आवश्यक असणाऱ्या बाबी याचा सुंदर परामर्श येथे साधण्यात आला.

त्यानंतर उपस्थित महिला योग साधक वर्गासाठी विविध सांस्कृतिक कार्यक्रमाच आयोजन करण्यात आलं होतं. यामध्ये सर्वच महिला मंत्रमुग्ध झाल्या आणि खऱ्या अर्थाने तीन दिवशीय कार्यशाळा एक वेगळी अनुभूती देणारी ठरली. यातून प्राप्त परिस्थितीत जीवन सकारात्मक रीतीने कसं जगाव याची प्रत्यक्ष अनुभूती चिंतनीय व विचारांना ,जीवनाला गती देणारी ठरली.

वरिष्ठ राज्य प्रभारी आद सुधाताई, राज्यकार्यकारीणी सदस्य आद. रमा ताई, मोनाताई, ज्योतीताई, कल्पनाताई,अनिताताई, मंगलताई व मान्यवर पाहुणे या सर्वांच्या हस्ते पाच वर्षांपासून यामध्ये पूर्णपणे सक्रिय असलेल्या योग साधकाना त्यांच्या कार्याची दखल घेत स्मृतिचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले.आमदार आदरणीय श्री.सुभाष देशपांडे साहेब यांच्या हस्ते स्मृतिचिन्ह देऊन जिल्हाप्रभारींना गौरविण्यात आले.

तसेच  “करे योग रहे निरोग” या ध्यासाने प्रेरित होऊन लोकांचे आरोग्य सुदृढ,निरोगी, रोगमुक्त करण्यासाठी गावपातळीवर काम करणाचे आवाहन ही करण्यात आले. हे जनहितार्थ राष्ट्र व देश कार्याचे काम निस्वार्थी भावनेने करण्याचे व्रत स्वीकारत व तशी शपथ घेऊन अत्यंत भारावलेल्या क्षणांनी सामूहिक छायाचित्र घेत एकमेकांचा निरोप घेऊन या कार्यशाळेची सांगता झाली.

सौ. वर्षाराणी बलवंत अभ्यंकर (जिल्हा सोशल मीडिया प्रभारी,सिंधुदुर्ग), भ्रमणध्वनी..९४०३५६२६५२.


Spread the love

Related posts

महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या राज्य कार्याध्यक्षपदी श्री संजय बनसोडे.

news

किशोर कदम यांची झिम्माड महोत्सव-२०२३ च्या स्वागताध्यक्ष पदी निवड!

news

कायदा करण्यासह ‘लव्ह जिहाद’ची चर्चा घरोघरी व्हायला हवी! अधिवक्त्या मणि मित्तल, सर्वाेच्च न्यायालय

news

Leave a Comment