स्टोरी

जागतिक महिला दिनानिमित्त देऊळवाडा येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन!

Spread the love

मसुरे प्रतिनिधी: जागतिक महिला दिनानिमित्त देऊळवाडा, वेताळ मंदीर नाडाळा येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन करत महिला दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमामध्ये पू.प्रा.शाळेपासून माऊली मंदिर,भरतेश्वर मंदिर ते वेतोबा मंदिर पर्यत प्रभात फेरी काढण्यात आली.सकाळी काढलेल्या या फेरीत शालेय विद्यार्थी,महिलां तसेच देऊळवाडा ग्रामपंचायत सरपंच,सदस्य कर्मचारी व ग्रामस्थ सहभागी झाले होते. कार्यक्रमाचे उद्घाटन मा. रजनीताई जोशी यांच्या हस्ते दीप्रज्वलनाने करण्यात आल. यावेळी महिला पतंजली योग समिती सिंधुदुर्गच्या जिल्हाध्यक्ष सौ.दीपश्री खाडीलकर,सौ तृप्ती तोरस्कर, प्रिया कोचरेकर, श्रीमती मनाली फाटक, प्रमुख अतिथी मान.फातिमा सिस्टर, देऊळवाडा, ग्रामपंचायत उपसरपंच नरेंद्र सावंत, ग्रामसेवक सुनिल मलगावकर, अशोक मसुरकर, चंद्रकांत राणे, मीनल तांबे, सौ.मनीषा बागवे, सौ. साधना चौगुले, सौ.वर्षाराणी अभ्यंकर, तसेच प्राथमिक शाळेचे शिक्षक प्रशांत पारकर ,सचिन डोळस,सापळे मॅडम,स्वाती डोळस, श्री.महेश बागवे, सौ.जयमाला भोगले, मनाली फाटक. आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते. सर्व मान्यवरांनी यावेळी आपली मनोगते व्यक्त केली. यावेळी रजनीताई जोशी यांनी “शेती व रोजगाराच्या वाटा व संधी” यावर उपस्थितांशी संवाद साधला…त्यानंतर “आरोग्य विषयक मार्गदर्शन” करताना महिला पतंजली योग समिती सिंधुदुर्गच्या योग शिक्षक खाडीलकर,तोरस्कर,कोचरेकर यांनी शारीरिक व्याधीनुसार सर्वाना उपयुक्त योगप्रकार, प्राणायम यांचे प्रात्यक्षिक दाखवत उत्तम असे मार्गदर्शन केले.दुपारच्या सत्रात शालेय विद्यार्थी (छोटा गट) व महिला मोठा गट यांनी अनेक रेकॉर्ड डान्स सादर करत कार्यक्रमात रंगत आणली.त्यानंतर सादर झालेल्या गितगायन कार्यक्रमात ग्रामस्थ महिलांनी भक्तिगीते, भावगीते, नाट्यसंगीत सादर करून उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. तसेच शालेय विद्यार्थ्यांनी जिजाऊ व महिला दिनावर उस्फुर्तपणे भाष्य करत सर्वांची वाहव्वा मिळवली.तसेच संध्याकाळी “होममिनिस्टर”हा कार्यक्रम झाला.हा कार्यक्रम पुण्याच्या सौ.वैशाली गायकवाड, सौ.सुजाता गायकवाड या ताईंनी घेतला..यामध्ये छोट्या मोठया खेळांसमवेत कॅटवॉक,फॅशनशो ची मजा महिला,युवती यांनी मनमुरादपणे लुटली.या संपूर्ण महिला दिनाच्या कार्यक्रमात गीतेश्री मसुरकर, संपदा बागवे,प्रज्ञा बागवे,सिमरन बागवे,समीक्षा बागवे,सानिका बागवे .सौ.अर्चना कोदे, छाया बागवे, मनीषा बागवे,अश्विनी परब,राजश्री घाडीगावकर, रंजना मुळ्ये, सुनीता परब, जयमाला भोगले, नम्रता बागवे,प्रमिला बागवे, रंजना बागवे, तन्वी लाड, आदींनी संपूर्ण कार्यक्रमाची धुरा सांभाळली. सूत्रसंचालन सौ. वर्षाराणी अभ्यंकर,प्रज्ञा परब,विद्या लाकम यांनी केले.तर प्रास्ताविक व आभार प्रदर्शन सौ. वर्षाराणी बलवंत अभ्यंकर यांनी केले..या देऊळवाडा मसुरे गावात महिला दिनाचे हे चौथे वर्ष.हे साजरे करण्यामागे ग्रामस्थ महिलांना एक दिवस तरी स्वतःसाठी वेळ देत रोजच्या प्रचंड मेहनतीच्या शेतीवाडीच्या कामातून मुक्त होत अशा कार्यक्रमाचा मनमुराद आनंद लुटता यावा, त्यांना एक हक्काचं व्यासपीठ मिळावं, त्यांच्यातील गुणकौशल्याना वाव मिळावा, त्या आत्मनिर्भर व्हाव्यात…व त्यांना स्वतःची ओळख सापडावी हा या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश होता असे सौ.वर्षाराणी अभ्यंकर यांनी सांगितले. यावेळी मारिया लोबो व येसुख्रिस्त ग्रुप सर्व सदस्य,दीपाली बागवे, वर्षा परब,ज्योती परब,सुरेखा परब,रुक्मिणी परब,प्रिया बागवे आदी उपस्थीत होत्या. फोटो: देऊळवाडा येथील महिला दिनाचे प्रभात फेरीरीत सहभागी महिला पुरुष, सोबत रजनीताई जोशी सोबत वर्षाराणी अभ्यंकर, नरेंद्र सावंत, चंद्रकांत राणे, दिपश्री खाडिलकर, तृप्ती तोरसकर, आदी मान्यवर.


Spread the love

Related posts

गोळवण येथील महाराजस्व अभियानाचा १२५ जणांना लाभ!

news

गोवा राज्यातील डिचोली गांवातील मये पुण्यभूमी येथील आदिमाया आदिशक्ती महिषासुरमर्दिनी श्री देवी केळबाई आई देवीचा , श्री देवी महामाया आई देवीचा स्वयंभू श्री देव मयेकर कुळकार दैवताचा वर्धापनदिन

news

म्हसळयांत शिवजयंती उत्साहांत झाली साजरी : बहुतांश राजकीय पक्ष रयतेच्या राज्याचे झेंडया खाली आले एकत्र.

news

Leave a Comment