स्टोरी

चौकुळ नजीक खडपडे येथे श्री देव मल्लनाथ प्राणप्रतिष्ठापना व कलशारोहण सोहळ्याचे आयोजन.

Spread the love

सावंतवाडी प्रतिनिधी: चौकुळ नजीक खडपडे येथील मल्लनाथ मंदिर येथे श्री देव मल्लनाथ, सातेरी, भावई, भूतनाथ, वेताळ व लिंग सहपरिवार देवता स्थिर प्रतिष्ठा श्री देव मल्लनाथ प्राणप्रतिष्ठापना व कलशारोहण सोहळा सोमवार १२ मे ते बुधवार १४ मे या कालावधीत संपन्न होणार आहे. यानिमित्त मंदिरात सोमवार १२ मे रोजी सकाळी ८ ते दुपारी १ प्रायाश्चित्त (खौर), पुण्यहवाचन, जलाधिवास, मंगळवार १३ मे सकाळी ८ ते दुपारी १ प्राकारशुध्दी, मुख्य देवतेची प्रतिष्ठापना, वास्तु, गृहयज्ञ, पर्याय होम, बुधवार १४ मे रोजी सकाळी ८ ते दुपारी १ प्राकारशुध्दी, स्थापित देवता पूजन, शिखर स्थापना, देवता स्थिर प्रतिष्ठा, बलिदान, पुर्णाहुती, गाऱ्हाणे, आरती, महाप्रसाद आदी कार्यक्रम होणार आहेत. यादिवशी सकाळी ११: ५० वाजता या शुभमुहूर्तावर कलशारोहण व मुर्तीप्रतिष्ठा करण्यात येणार आहे.

या धार्मिक सोहळा चौकुळ, कुंभवडे व खडपडे प्रमुख मानकरी, गावकरी व समस्त ग्रामस्थ मंडळी सर्व सिमधडे, बहुमानी, सीमशेजारी, गाव पुरोहित व पुरोहित यांच्या उपस्थितीत होणार आहे. भाविकांनी या प्राणप्रतिष्ठापना व कलशारोहण सोहळ्याला उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आले आहे.


Spread the love

Related posts

सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठान कडून सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयाला रुग्णपयोगी वस्तूंचे वाटप होणार.

news

मधुकर मातोंडकर यांना मुंबई एकता कल्चरल अकादमीचा ‘सांस्कृतिक कार्यकर्ता’ पुरस्कार जाहीर….!

news

वैश्यवाणी समाजाच्या ओबीसी प्रश्नावर महत्त्वपूर्ण यश.

प्रसाद परब

Leave a Comment