स्टोरी

कृतज्ञता सप्ताहा’ निमित्त क्रेडाई सावंतवाड़ीतर्फे बांधकाम कामगारांसाठी नेत्र तपासणी आणि आरोग्य तपासणी.

Spread the love

सावंतवाडी प्रतिनिधी:

क्रेडाई महाराष्ट्रच्या वतीने साजऱ्या करण्यात येणाऱ्या ‘कृतज्ञता सप्ताहा’च्या निमित्ताने क्रेडाई सावंतवाडी तर्फे नॅब आणि उपजिल्हा रुग्णालय सावंतवाडी यांच्या सहकार्याने मंगळवार, दिनांक ६मे २०२५ रोजी पंचमी हाईट्स येथे नेत्र व आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले.

 

या वेळी उपस्थित कामगार लोकांना आवश्यक ती औषधे पुरवण्यात आली.तसेच काही कामगारांना चष्म्याचे वाटप सुद्धा करण्यात आले.महिला कामगारांसाठी स्वतःची स्वच्छता आणि मुलांची देखभाल या संदर्भात क्रेडाई वुमन विंग तर्फे मार्गदर्शन करण्यात आले.

कार्यक्रमाच्या शेवटी सर्व कामगारांसाठी भोजन व्यवस्था करण्यात आली.

या वेळी क्रेडाई सावंतवाडीचे अध्यक्ष श्री. नीरज देसाई,सचिव दादा खोर्जुवेकर,खजिनदार श्री. यशवंत नाईक,सदस्य श्री .प्रवीण परब,श्री.सतीशचंद्र बागवे,श्री.उदय नाईक,श्री.लक्ष्मीकांत पांचाळ ,क्रेडाई वुमन्स विंग च्या अध्यक्षां सौ.वैदेही देसाई , सौ.अमित खोर्जुवेकर,सौ.श्रुती कल्याणकर,युथ विंगच्या सदस्या कुमारी.कल्याणकर तसेच नॅबच्या डॉ.उत्कर्षा धोंडे मॅडम आणि उपजिल्हा रुग्णालय तर्फे डॉ.अटक सर आणि बांधकाम कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते.या कार्यक्रमासाठी नॅब सावंतवाडी आणि उपजिल्हा रुग्णालय सावंतवाडी आणि पंचमी हाईट्सचे मालक श्री व सौ.खोर्जुवेकर यांचे मोलाचे सहकार्य क्रेडाई सावंतवाडी याना मिळाले.


Spread the love

Related posts

पिंगुळी येथील ट्रक टर्मिनस येथे रिक्षा व कार यांच्यात अपघातात.

news

अन्यथा जन आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागेल! श्री. केसरकर

news

नवसाक्षरता अभियानावर शिक्षक संघटनांचा बहिष्‍कार !

news

Leave a Comment