स्टोरी

नेनेवाडीतील राजमुद्रा प्रतिष्ठानला डॉ. चंद्रकांत सावंत यांच्याकडून आर्थिक मदत सुपूर्द.

Spread the love

सावंतवाडी प्रतिनिधी: ओवळीये गावचे सुपुत्र आंबोली निवासी तथा चौकुळ नेने प्राथमिक शाळा नं. ५ चे पदवीधर शिक्षक डॉ चंद्रकांत सावंत यांनी चौकूळ नेने येथील राजमुद्रा प्रतिष्ठानला लाऊड स्पीकर व मशीन संचासाठी आर्थिक मदत सुपूर्द केली. यावेळी पोलीस पाटील सागर गावडे, रामराव गावडे, आनंद परब, राजेंद्र परब, रुपेश गावडे, राजमुद्रा प्रतिष्ठानचे अध्यक्ष किशोर गावडे, उपाध्यक्ष विजय परब, सचिव विनायक गावडे, खजिनदार सुनील गवस, साहिल गावडे, शैलेश गावडे, मंडळाचे सर्व सदस्य, ग्रामस्थ, महिला, पालक, विद्यार्थी उपस्थित होते.

       डॉ. चंद्रकांत सावंत यांनी चार वर्षांपूर्वी आर्थिक परिस्थिती अभावी कर्ज फेडू न शकलेल्या फणसवडे गावातील १६ महिलांचे एकूण ५ लाख ३५ हजार ५२५ रुपयाचे कर्ज स्वतः भरून या महिलांना त्यांनी कर्ज मुक्त केले. तसेच त्यांनी सावित्रीबाई फुले दत्तक पालक योजनेंतर्गत जिल्ह्यातील प्राथमिक व उच्च प्राथमिक, माध्यमिक अशा ८० शाळांमधील १३३ विद्यार्थीनी कायमस्वरूपी दत्तक घेत चार लाख १६ हजार रुपये कायमस्वरूपी देणगी दिली. या देणगीच्या व्याजातून दरवर्षी त्या त्या शाळेतील एकूण १३३ मुलींचा कायमस्वरुपी शैक्षणिक खर्च करण्यात येणार आहे. त्यांनी स्वतः पदरमोड करून केलेल्या शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रातील सर्वोत्कृष्ट कार्याची नोंद विविध राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये झालेली असून विविध सेवा व संस्था त्यांनी दखल घेत त्यांना अनेक मानसन्मान व पुरस्कार प्रदान केले आहेत.

यावेळी डाॅ. चन्द्रकांत सावंत यांचा त्यांच्या शैक्षणिक सामाजिक कार्याबद्दल शाल, श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला. त्यानंतर डॉ. चन्द्रकांत सावंत यांनी आपल्या सन्मानाची १३० वी शाल व श्रीफळ जेष्ठ ग्रामस्थ महादेव रामा गावडे यांना प्रदान करत त्यांच्या सामाजिक कार्याचा गौरव केला.


Spread the love

Related posts

दहावी उत्तीर्ण धर्मशास्त्र अभ्यासकांना निलंबित करा !

news

चंद्राच्या अधिक निकट पोचले भारताचे ऐतिहासिक ‘चंद्रयान-३’ !

news

हनी ट्रॅपमध्ये अडकलेल्या डॉ. प्रदीप कुरुलकरांनी मोबाइलमधील डेटा केला होता डिलीट !

news

Leave a Comment