स्टोरी

धुदुर्गातील ‘ऐलमा पैलमा अक्षर देवा’ या सिंधुदुर्गातील साहित्यिक महिलांच्या समूहाचे छोटेखानी साहित्य संमेलन संपन्न.

Spread the love

कुडाळ प्रतिनिधी: माणगांव येथील श्री वासुदेवानंद सरस्वती वाचनालय येथे सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त विविध कार्यक्रम आयोजित केले जात आहेत. त्या अंतर्गत आज रविवारी दिनांक २३ फेब्रुवारी रोजी सिंधुदुर्गातील ‘ऐलमा पैलमा अक्षर देवा‘ या सिंधुदुर्गातील साहित्यिक महिलांच्या समूहाचे छोटेखानी साहित्य संमेलन संपन्न झाले. कार्यक्रमात जेष्ठ लेखिका मंदाकिनी गोडसे, स्नेहल माळकर-फणसळकर, डॉ. सुमेधा नाईक, डॉ. गौरी गणपत्ये, डॉ मेधा फणसळकर, ॲड.अंजली मुतालिक, ॲड. अपर्णा प्रभू, स्वाती सावंत, अनुष्का रेवंडकर, मंजिरी मुंडले, स्मिता नाईक, देवयानी आजगांवकर, प्रीतम ओगले, सानिका वायंगणकर , महेक शेख या साहित्यिकांनी आपल्या कविता आणि लेखांचे वाचन केले.

कार्यक्रमाच्या सुरवातीला वाचनालयाचे सचिव एकनाथ केसरकर यांनी प्रास्ताविक केले. परिचय आणि आभार वाचनालयाच्या अध्यक्षा स्नेहल फणसळकर यांनी मानले. यावेळी वाचनालायचे उपाध्यक्ष सदाशिव पाटील, संचालक विजय पालकर, शरद कोरगावकर, वाचनालायचे कर्मचारी तसेच सेलेस्तिन शिरोडकर, प्रकाश तामणेकर, संगीता देशपांडे, स्नेहा चव्हाण, अपूर्वा चव्हाण आणि साहित्यप्रेमी उपस्थित होते.


Spread the love

Related posts

सावंतवाडी नगरपरिषदतर्फे सन २०२३-२४ या आर्थिक वर्षासाठी मालमत्ता कर व पाणीपट्टी भरणा करण्याचे नागरीकांना आवाहन.

news

उडान महोत्सवाचे यजमानपद पुन्हा गव्हाणकर महाविद्याला..!

news

आरोंदा गावात शिवकालीन वस्तुंचे भव्य प्रदर्शनास सावंतवाडी तालुका मनसेने दिली भेट.

news

Leave a Comment