स्टोरी

आरोग्यदायी व सुखी जीवनासाठी योगा आवश्यक..! साधना गुरव

Spread the love

सावंतवाडी प्रतिनिधी: योगामध्ये सूर्यनमस्कार प्रकाराला विशेष स्थान असुन आरोग्यदायी व सुखी जीवनासाठी प्रत्येकाने रोज योगा केला पाहिजे. असे आवाहन ओरोस आयुष विभागाच्या योग व निसर्गोपचार तज्ञ साधना गुरव यांनी केले.

सूर्यनमस्कार दिनानिमित सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात आयुष् विभागअंतर्गत मंगळवारी आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात सूर्यनमस्कार बाबत मार्गदर्शन करतांना साधना गुरव बोलत होत्या. यावेळी डॉ ज्ञानेश्वर ऐवळे, डॉ धीरज सावंत, डॉ निखिल अवधूत, डॉ निलेश अटक, सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयाचे आयुष वैद्यकीय अधिकारी डॉ सागर जाधव आदी उपस्थित होते.

यावेळी डॉ निलेश अटक यांनी सूर्यनमस्काराचे महत्त्व आणि दैनंदिन आवश्यकता व मानसिकता याबद्दल बहुमोल माहिती देऊन सूर्यनमस्कार या प्रकाराची सविस्तर माहिती दिली. यावेळी उपस्थित योगसाधकांनी सूर्यनमस्काराच्या १२ आवर्तनाची प्रात्यक्षिके दाखवून सर्वांनी रोज सूर्य नमस्कार करण्याचे आवाहन केले.

यावेळी सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयाच्या सर्व विभागाचे इन्चार्ज सिस्टर, प्रयोगशाळा विभागाचे इन्चार्ज आणि कर्मचारी, कार्यालय प्रमुख सौ येळेकर, एन सी डी विभागाच्या सौ कशाळकर,आय सी टी सी प्रयोगशाळा तंत्रज्ञ उपस्थित होते. सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयाचे आयुष वैद्यकीय अधिकारी डॉ सागर जाधव यांनी उपस्थितांचे आभार मानले.


Spread the love

Related posts

भारतीय सैन्यात पाकिस्तानी नागरिक नोकरी करत असल्याचा आरोप!

news

प्रश्न जिथे मराठी माणसाचा, उत्तर फक्त मनसेचा..!

news

राजे प्रतिष्ठान कामगार सेना महाराष्ट्र राज्यच्या सिंधुदुर्ग चित्रपट सेना अध्यक्षपदी गजेंद्र कोठावळे यांची नियुक्ती.

प्रसाद परब

Leave a Comment