स्टोरी

वेर्ले गावातील हे लघु धरण निश्चितच पर्यटन विकासाच्या दृष्टीने सह्याद्री पट्ट्याला वरदान ठरणार..! आ. दिपक केसरकर

Spread the love

सावंतवाडी प्रतिनिधी: वेर्ले गावातील हे लघु धरण निश्चितच पर्यटन विकासाच्या दृष्टीने सह्याद्री पट्ट्याला वरदान ठरणार आहे. शिरशिंगे येथील मध्यम धरण प्रकल्प आणि वेर्ले हे दोन्ही धरण सह्याद्री पट्ट्यातील दशक्रोशीतील गावे सुजलाम सुफलाम होणार आहेत. उडेली धरण हे सावंतवाडी शहराला पाणीपुरवठा करण्यास सुलभ होईल. सावंतवाडी तालुक्यात नव्याने तीन धरण प्रकल्प एक नवी संजीवनी देणारे आहेत. असे आमदार दीपक केसरकर यांनी स्पष्ट केले. वर्ले येथील ९० कोटी रुपये खर्चाच्या लघु धरण प्रकल्पाच्या कामाचा भूमिपूजन श्री केसरकर यांच्या हस्ते आज करण्यात आले.

यावेळी उपविभागीय अधिकारी श्री धोत्रे.ळ, सौरभ आहिरे, सचिन वालावलकर, सरपंच सुचिता राऊळ, उपसरपंच मोहन राऊळ, बाबा उर्फ यशवंत राऊळ, गोविंद लिंगवत, रवींद्र मडगावकर, पंढरी पुनाजी राऊळ, माझी जि. प. सदस्य पंढरी राऊळ, जीवन लाड, राजन रेडकर, जिल्हाप्रमुख अशोक दळवी,चंद्रकांत उर्फ बाळा गावडे, श्री हरमलकर ठेकेदार प्रकाश पाटील आदी उपस्थित होते.

सह्याद्री पट्ट्यातील वेर्ले धरणाच्या कामाचे भूमिपूजन आज थाटात करण्यात आले. श्री केसरकर यांनी यावेळी येत्या दोन ते तीन वर्षात हे धरण पूर्ण होणार आहे. या धरणापासून या भागाला मुबलक पाणी साठा होईल. असे स्पष्ट केले.


Spread the love

Related posts

ओटवणे गावठणवाडी कला क्रीडा व मित्र मंडळ आयोजित गाव चव्हाटा महोत्सवाचा उदघाट्न सोहळा मान्यवारांच्या उपस्थितीत उत्साहात संपन्न.

news

श्री अरुण आडिवरेकर यांना राज्यस्तरीय कोकण विभागीय शि. म. परांजपे उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार जाहीर.

news

प्रभाग ९ आय अंतर्गत विध्नहर्ता सोसायटीत बेकायदेशीर अनधिकृत बांधकाम!लेखी तक्रारी नंतरही अनधिकृत बांधकामाकडे दुर्लक्ष!

news

Leave a Comment