स्टोरी

देशभक्त शंकरराव गव्हाणकर महाविद्यालयात पाच दिवसीय युवा महोत्सवाचे आयोजन.

Spread the love

सावंतवाडी प्रतिनिधी: येथील देशभक्त शंकरराव गव्हाणकर महाविद्यालयात ६ ते ११ जानेवारी या कालावधीत पाच दिवसीय युवा महोत्सव सुरू आहे. या महोत्सवाचे दीप प्रज्वलन करून उद्घाटन लोकमान्य ट्रस्टचे संचालक तथा संवाद तरुण भारतचे वितरण व्यवस्थापक सचिन मांजरेकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे तरुण भारत संवाद चे पत्रकार, कोकण मराठी साहित्य परिषद चे तालुकाध्यक्ष एडवोकेट संतोष सावंत, लोकमान्य ट्रस्ट चे सीनियर एक्झिक्युटिव्ह प्रवीण प्रभू केळुस्कर, प्राचार्य यशोधन गवस आधी उपस्थित होते.

यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना एडवोकेट संतोष सावंत म्हणाले युवा महोत्सवातून विद्यार्थ्यांनी आपल्या अंगी असलेल्या कलागुणांना वाव द्यावा. यातून मुंबई विद्यापीठाच्या उडान महोत्सवात आपली चमक दाखवावी. आपण ज्या महाविद्यालयात शिकून मोठे होतो त्यानंतर आपण त्या महाविद्यालयाचे कायम स्मरण करणे आवश्यक आहे. असे ते म्हणाले. यावेळी श्री प्रभू केळुसकर यांनी लोकमान्य ट्रस्ट च्या माध्यमातून उच्च पदवी शिक्षण देणारे दालन उभे आहे. या माध्यमातून विद्यार्थी घडवले जात आहेत. असे ते म्हणाले. यावेळी प्राचार्य श्री गवस यांनी ६ ते ११ जानेवारी या कालावधीत विविध उपक्रम सांस्कृतिक कार्यक्रम पाक कला, क्रीडा स्पर्धा असे विविध कार्यक्रम घेतले जात आहेत. यातून विद्यार्थ्यांच्या कलागुणांना चालना मिळत आहेत. मुंबई विद्यापीठाचे उडान महोत्सव फेब्रुवारी महिन्यात आहे. याचे यजमानपद आपल्या महाविद्यालयाला मिळाले आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी त्या दृष्टीने आपली कला सादर करावी. असे ते म्हणाले.

सूत्रसंचालन विद्यार्थी आदिती कळंगुटकर व प्रणय गावडे तर आभार माया गवस यांनी मानले. यावेळी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्राध्यापक आनंद नाईक, साईप्रसाद पंडित, अस्मिता गवस,  शैलेश गावडे,  मेधा मयेकर आधी उपस्थित होते. यावेळी मोठ्या संख्येने विद्यार्थी सहभागी झाले होते. आज दिवसभर विद्यार्थ्यांनी विविध सांस्कृतिक कार्यक्रम केले. ट्रॅडिशनल डे व फूड फेस्टिवल आधी कार्यक्रमांचे आयोजन दोन दिवस करण्यात आले आहे. आज १० व ११ अशा दोन दिवशी क्रीडा महोत्सव घेतला जाणार आहे.


Spread the love

Related posts

नागपंचमीचे महत्त्व आणि नागदेवतेचे पूजन कसे करावे ?

news

पर्यटन विकासासाठी पर्यटन कंपन्यानी भर देऊन दुर्लक्षित कोकण सागरी किनारी पर्यटन वाढवूया..! ललित गांधी

news

जोसोली फणसखोल येथील प्रधान मंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत झालेल्या रस्त्याची दुरावस्था!

news

Leave a Comment