स्टोरी

बांदा येथे ध्वजस्तंभाची पुनर्स्थापना…! सर्वपक्षीय व ग्रामस्थ यांनी एकत्र येत दाखविला आदर्श.

Spread the love

बांदा प्रतिनिधी: येथील मुंबई-गोवा महामार्गावर गेली कित्येक वर्षे झळकणारा बांदा शहराचे प्रतीक असलेला व उड्डाणपुलाच्या कामामुळे काढण्यात आलेला ध्वज आज सर्वपक्षीय तसेच समस्त बांदावासीय यांनी एकत्र येत एकी दाखवत पुनर्स्थापित केला. बांदा शहर हे कायमच त्याच्या एकीसाठी जिल्ह्यात आदर्श असून आज पुन्हा एकदा याचे दर्शन बांदावासीयांनी दाखवले. जुन्या मुंबई गोवा महामार्गावर स्थापित करण्यात आलेला भगवा ध्वज नियोजित उड्डाणपुलाच्या कामामुळे काढण्यात आला होता. उड्डाणपुलाचे काम जवळपास पूर्ण होत आल्याने समस्त बांदावासीय तसेच विशेष म्हणजे सर्वपक्षीय पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी एकत्र येत तो पुनर्स्थापित केला. यावेळी बांदा येथील सामाजिक कार्यकर्ते साईप्रसाद कल्याणकर यांच्या हस्ते ध्वजस्तंभाची पूजा करून विधीवत स्थापना करण्यात आली.

यावेळी माजी सैनिक निलेश सावंत,भाजपा जिल्हाध्यक्षा श्वेता कोरगावकर, महेश सारंग, बांदा मंडल अध्यक्ष महेश धुरी, सरपंच प्रियांका नाईक, माजी जिल्हा परिषद सदस्य प्रमोद कामत, वरिष्ठ पदाधिकारी सिद्धेश पावसकर,बांदा मंडल क्रीडा संयोजक गुरु कल्याणकर, ग्रामपंचायत सदस्य रत्नाकर आगलावे, आबा धारगळकर, शिवसेना शिंदे गट विभाग प्रमुख राजेश विरनोडकर, शिवसेना उभाठा गट शहर प्रमुख साई काणेकर, मनसे शहराध्यक्ष मिलिंद सावंत, तंटामुक्ती अध्यक्ष संदेश पावसकर, व्यापारी संघ अध्यक्ष दत्तप्रसाद पावसकर तसेच मिलिंद परब, हेमंत दाभोळकर, मंदार केसरकर, केदार कर्णबर्गी, जय सावंत, सौरभ आगलावे, स्वागत नाटेकर, अक्षय बांदेकर, सनी बांदेकर, भाई म्हाडगुत, साईराज पावसकर, सुनील नाटेकर, शैलेश केसरकर, सागर सावंत, नितेश पेडणेकर, नार्वेकर सर व असंख्य ग्रामस्थ उपस्थित होते.


Spread the love

Related posts

मार्च २०२४ पासून स्लीपर कोच असलेली ‘वन्दे भारत एक्स्प्रेस’ (Vande Bharat Express) धावणार !

news

सिंधुदुर्गात पहिलाच “AaGaaz Fashion Runway 2026” जल्लोषात..!

प्रसाद परब

नटवर्य कै. राम गणेश गडकरी’ स्मृतीप्रित्यर्थ “सवेष साभिनय नाट्यगीत गायन स्पर्धा २०२४” मध्ये ‘श्री राधाकृष्ण संगीत साधना’च्या विद्यार्थ्यांची बाजी.

news

Leave a Comment