सनातन

हिंदू जनजागृती समितीचा अनोखा उपक्रम ! त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त ‘एक दीप हिंदू राष्ट्रासाठी’!

Spread the love

सिंधुदुर्ग: त्रिपुरारी पौर्णिमेच्या शुभ मुहूर्तावर मंदिरात आणि घरांमध्ये दिवे लावून हिंदू बांधवांनी यावर्षीही दीपोत्सव साजरा केला. या निमित्ताने देशभरात ठिकठिकाणी मंदिरांमध्ये स्थित त्रिपुर (दीपमाळ) प्रज्वलित केले गेले. यंदाच्या दीपोत्सवाचे वैशिष्ट्य म्हणजे हिंदु राष्ट्राचा संकल्प करण्यासाठी ‘एक दीप हिंदू राष्ट्रासाठी’ हा उपक्रम हिंदू जनजागृती समितीच्या वतीने देशभरात राबवून जनजागृती करण्यात आली. श्री दत्त मंदिर, माणगाव, श्री भावकादेवी मंदिर, पडेल श्री देवी यक्षिणी मंदिर, माणगाव श्री दत्त मंदिर, चौके, श्री देव वेतोबा मंदिर, आरवली, श्री पटकी देवी मंदिर, कणकवली, श्री दत्त मंदिर कुळकरवाडी , चौके, मालवण, श्रीदेवी पावणाई मंदिर माडखोल येथे झालेल्या या उपक्रमात विविध हिंदू संघटना प्रतिनिधी व धर्मप्रेमी उपस्थित होते.

कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी श्री शंकराने त्रिपुरासुराचा नाश केला, त्या प्रित्यर्थ त्रिपुरारी पौर्णिमेचा उत्सव साजरा केला जातो. आसुरी शक्तीवर चांगल्या शक्तीचा विजय म्हणून तो भारतातील बर्‍याच ठिकाणी मंदिरांतून साजरा केला जातो. सध्या समाजात असलेल्या अनिष्ट प्रवृत्ती नष्ट करून लोककल्याणकारी हिंदू राष्ट्र यावे या उदात्त हेतूने ‘एक दीप हिंदू राष्ट्रासाठी’ या उपक्रमातून समाजामध्ये जनजागृती करण्यात आली. या उपक्रमात सहभागी झालेल्या हिंदू धर्मप्रेमींनी मंदिरे, घरी आदी ठिकाणी दीप प्रज्वलित करताना ‘एक दीप हिंदू राष्ट्रासाठी’ याविषयीचे फलक हातात धरून लोकांचे प्रबोधन केले. काही ठिकाणी सामूहिक दीपपूजन करताना हिंदू राष्ट्राची प्रतिज्ञा घेण्यात आली. सोशल मीडियातही हा उपक्रम चर्चेचा विषय ठरला.

 


Spread the love

Related posts

बांगलादेशातील हिंदूवरील अत्याचार थांबत नाही तोपर्यंत भारत-बांगलादेश क्रिकेट सामने रद्द करा !

news

देवस्थान इनाम निर्मूलन मसुद्याला महाराष्ट्र मंदिर महासंघाचा तीव्र विरोध; मसुदा तात्काळ मागे घेण्याची मागणी.

प्रसाद परब

दिल्लीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील ऐतिहासिक शस्त्रांचे भव्य प्रदर्शन!

news

Leave a Comment