राजकारण

विलवडे येथील शिवसैनिक सोनू दळवी यांची उबाठा शिवसेनेच्या सावंतवाडी उपतालुका पदी निवड.

Spread the love

ओटवणे प्रतिनिधी: शिवसेनेच्या उबाठा सावंतवाडी उपतालुका पदी विलवडेचे सोनू दळवी यांची निवड करण्यात आली. सोनू दळवी ओटवणे दशक्रोशीतील तरुण तडफदार युवा नेता असून त्यांचा संपर्क मोठा आहे. गेली पंधरा वर्षे विविध क्षेत्रात कार्यरत असलेल्या सोनू दळवी यांचे सामाजिक कार्यातही त्यांचे मोठे योगदान आहे.

आगामी काळात होऊ घातलेल्या विधानसभा, जिल्हा परीषद व पंचायत समितीच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना उबाठा सावंतवाडी तालुका संघटना मजबूत करण्यासाठी नवनिर्वाचित सावंतवाडी विधानसभा प्रमुख रुपेश राऊळ यांच्या नेतृत्वाखाली संपर्क यात्रा सुरु आहे. त्या पार्श्वभूमीवर विलवडे येथील शिवसैनिक सोनू दळवी यांच्याकडे सावंतवाडी उपतालुका पदाची जबाबदारी देण्यात आली आहे.

यावेळी सावंतवाडी विधानसभा प्रमुख रुपेश राऊळ, जिल्हा समन्वयक बाळा गावडे, उपजिल्हा प्रमुख चंद्रकांत कासार, संघटक मायकल डिसोजा, महीला संघटीका सुकन्या नरसुले, भारती कासार, नम्रता झारापकर, शब्बीर मणियार, शिवदूत अशोक परब, माजगाव विभाग प्रमुख सुनील गावडे, अशोक धुरी आदी शिवसैनिक उपस्थित होते.


Spread the love

Related posts

उरण विधानसभा मतदारसंघातील शिवसेना पदाधिकाऱ्यांची बैठक मोठ्या उत्साहात संपन्न.

news

लोकसभेची लढाई जिंकून गद्दारांना गाडण्यासाठी उद्धव ठाकरे कोकणात…! जिल्हा संपर्कप्रमुख अरूण दुधवडकर

news

माजी आमदार परशुराम उपरकर यांचा परिवहन कार्यालयात घेराव

news

Leave a Comment