स्टोरी

सावंतवाडी वनविभागाच्या वतीने मानव वन्यजीव संघर्षाची परिस्थिती हातळण्यासाठी सुसज्ज जलद बचाव पथकची स्थापना….!

Spread the love

सावंतवाडी प्रतिनिधी: सिंधुदुर्ग जिल्ह्यात विविध ठिकाणी वन्यप्राणी मानव वस्ती जवळ तसेच शेतात येऊन मानव वन्यजीव संघर्षाच्या घटना घडत असतात . तसेच वन्यप्राणी विहिरीत पडून जखमी झाल्या च्या घटना वारंवार घडत असतात त्यावरील उपाययोजना म्हणून सावंतवाडी वन विभागाच्या वतीने मा. श्री नवकिशोर रेड्डी उपवनसंरक्षक सावंतवाडी यांच्या शुभहस्ते व मा. श्री सुनील लाड सहा. वनसंरक्षक व श्रीम. नेहा वानरे परिविक्षाधीन सहा. वनसंरक्षक यांच्या प्रमुख उपस्थितीत सर्व आवश्यक साधनांनी सुसज्ज अशा जलद बचाव पथक RRT (Rapid Rescue team) ची स्थापना करण्यात आली. या प्रसंगी वनक्षेत्रपाल श्री क्षीरसागर व वनक्षेत्रपाल श्री. कुंभार तसेच इतर वनाधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. वन्यप्राणी बचाव करणे बरोबरच या पथकाच्या मार्फत मनुष्यवस्ती नाजिक वन्यप्राणी यांच्या उपद्रव असणाऱ्या क्षेत्रात RRT टीम मार्फत पिंजरे लावून वन्यप्राणी विशेषत माकड ,वानर यांना पकडून त्यांना सुखरूप नैसर्गिक अधिवासात मुक्त करण्यात येणार आहे.

तरी अश्या प्रकारे मनुष्यवस्तीत वन्यप्राणी आढळल्यास तसेच माकड वानर यांचा उपद्रव असणाऱ्या भागातील नागरिकांना वन विभागाच्या वतीने आवाहन करण्यात येते की या बाबतची माहिती तात्काळ विभागीय कार्यालय येथील RRT कंट्रोल रूम ला हेल्पलाइन क्रमांक +91 2363-272005 देण्यात यावी.


Spread the love

Related posts

नागपूर येथे जेष्ठ नागरिकांचा आ. वैभव नाईक यांच्या हस्ते सत्कार

news

प्रकाश सिंग बादल यांच्या निधनानंतर दोन दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर

news

सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठान व कोकण संस्थेच्या संयुक्त विद्यमाने भव्य आरोग्य शिबिराचे आयोजन.

newss

Leave a Comment