स्टोरी

हरित लवादाने उपप्रादेशिक परिवहन कार्यालयासह इतर नऊ जणांनाबजावली कारणे दाखवा नोटीस.

Spread the love

सावंतवाडी प्रतिनिधी:  बांदा सटमटवाडी येथील सीमा तपासणी नाक्याच्या परिसरात राष्ट्रीय हरित लवादाने आदेश देऊनही ४४ सहस्र पैकी केवळ १६ सहस्र झाडांचीच लागवड करण्यात आल्याने आदेशाचा अवमान केल्याप्रकरणी हरित लवादाने उपप्रादेशिक परिवहन कार्यालयासह इतर नऊ जणांना कारणे दाखवा नोटीसा बजाविल्या आहेत. याप्रकरणी दि.१२ जुलै दिवशी सुनावणी घेऊन संबंधित विभागाला म्हणणे सादर करण्याचा जादेश हरित लवादाने दिला आहे. पा प्रकरणात पाच कोटी रुपयांचा दंड संबंधितना होऊ शकतो अशी माहिती याचिकाकर्ते साईप्रसाद कल्याणकर यांनी दिली आहे.

 

लवादाने नोटीस मध्ये म्हटले आहे कि, लावादाच्या आदेशाचा अवमान झाला असून कलम २६ व कलम २८ नुसार ठेकेदार, पोटठेकेदार आणि ज्या प्रशासकीय अधिकाऱ्यांनी पाठिकाणी दुर्लक्ष करून निसर्गाचा व्हास केला आहे. सीमा तपासणी नाक्याच्या परिसरात ४४ सहस्र झाडे लावण्याचे आदेश देण्यात आले होते, मात्र प्रत्यक्षात सर्वे केल्यानंतर १६ सहस्र झाडांचीच लागवड केल्याचे निदर्शनास आले आहे. लागवड करण्यात आलेल्या झाडांचे योग्य संगोपन देखील करण्यात आले नाही. त्यामुळे अवमान केल्याने नोटीसा बजाविल्या आहेत. याविषयी दि.१२ जुलै रोजी संबंधित अधिकारी व ठेकेदार यांना म्हणणे सादर करावे लागणार आहे. या प्रकरणात संबंधितना ५ कोटी रुपये दंड होण्याची शक्यता आहे. तसेच बेकायदा खनिज उत्खनन करताना ३५९.२५ कोटी रुपये स्टैंपड्युटी भरण्यात आली नाही. प्रकल्पाची जमीन एनए करण्यात न आल्याने १३९ कोटी रुपये तसेच ग्रामपंचायतचा इमारत कर न भरल्याने ५० लाख रुपये आर्थिक दंड होऊ शकतो अशी माहिती श्री कल्याणकर यांनी दिली आहे.

 

महामार्गाच्या मध्यबिंदूपासून ७५ मिटरच्या आत बांधकाम करण्यात आले आहे. तसेच येथूनच जाणाऱ्या तिलारी उपकालव्यालगत देखील कोणतीही परवानगी न घेता बांधकाम करण्यात आले आहे. नाक्याला २०३३ पर्यंत परवानगी देण्यात आली आहे. नाक्याला अतिरिक्त कालावधीसाठी परवानगी देण्यात येऊ नये अशी मागणी याचिकेत करण्यात आल्याचे कल्याणकर यांनी सांगितले.

येत्या दि.२० जुलै पर्यंत तपासणी नाका सुरू न केल्यास स्थानिक प्रकल्पसाठी जमीन गेलेले शेतकरी, भूमिपुत्र हे नाका काह्यात घेऊन सुरु करणार आहेत. अन्यथा आंदोलन छेडून नाका ताब्यात घेऊ.


Spread the love

Related posts

श्री तुळजाभवानीदेवीच्‍या गहाळ अलंकारांविषयी चौकशी व्‍हावी!

news

महेश गायकवाड यांच्या मध्यस्थीने सेंट थॉमस स्कूलने केलीली १५ टक्के फी वाढ अखेर रद्द !

news

श्री समर्थ साटम महाराज वाचनालय दाणोली येथे वाचन प्रेरणा दिनाचे औचित्य साधून विविध कार्यक्रम संपन्न.

news

Leave a Comment