स्टोरी

माय बाप नसलेल्या दिव्यांग डिमिलो भगिनींच्या मदतीसाठी दानशूर सरसावत आहेत.

Spread the love

सावंतवाडी:

वृत्तपत्र व सोशल मीडियावरील बातमी वाचून मातोंड हायस्कूलचे माजी मुख्याध्यापक श्री.विजय पुंडलिक मांजलकर गाव लोरे, ता. वैभववाडी येथून येऊन माय बापाचा आधार हरपलेल्या डिमेलो दिव्यांग भगिनींना रोख रुपये दहा हजार देऊन आर्थिक मदत केली. तसेच मांजलकर सर सामाजिक भान राखून गोरगरिबांना मदत करत असतात.

सामाजिक बांधिलकीची सचिव समीरा खलील, रवी जाधव व रुपा मुद्राळे यांनी त्यांचे मनःपूर्वक आभार मानले. त्याचप्रमाणे शहरातील दानशूर व्यक्ती त्या भगिनींसाठी जीवनावश्यक वस्तू पुरवण्यासाठी पुढाकार घेत आहे त्यांचेही आभार सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्री सतीश बागवे यांनी मानले आहे.


Spread the love

Related posts

बांदा येथील युवकांनी श्रमदानाने केली सार्वजनिक पाण्याच्या टाकीची साफसफाई…!

news

अजित पवार यांच्या विमान अपघातातील निधनाबद्दल शोकसभेचे आयोजन.

newss

दाभोळ खाडीत सांडपाणी सोडणार्‍या कारखान्यांवर कठोर कारवाई करा !

news

Leave a Comment