Uncategorized

माय बाप हरपलेल्या तीन दिव्यांग बहिणींना आधाराची गरज.

Spread the love

सावंतवाडी प्रतिनिधी: जाकलिन डिसोजा वय ३८ आल्विन डिसोजा ४०, डॉल्फिन डिसोजा ४५ या तीनही बहिणी मतिमंद आहेत. वीस वर्षांपूर्वी वडील मयत झाल्यानंतर त्यांचा पूर्ण सांभाळ त्यांच्या आईने केला. त्यांना नेहमीच मदतीचा हात देणारी सामाजिक बांधिलकीची कार्यकर्ती रूपा मुद्राळे यांनी त्यांना दहा वर्षे सांभाळल. त्या मुलींची आई म्हातारी झाल्याकारणाने वारंवार आजारी पडायची त्यांच्या आजारपणात सुद्धा रूपा मुद्राळे त्यांना पूर्णतः मदत करायची.

मागील २५ दिवसांमध्ये त्यांची आई अचानक तीनही दिव्यांग मुलींना सोडून गेली त्यावेळी आपली आई जिवंत आहे की गेली याचेही त्यांना भान नव्हतं दार बंद करून आई उठत नाही म्हणून दोन दिवस मेलेल्या आई सोबत त्या तिघही बहिणी झोपून राहिली. दोन दिवसानंतर यांची जाग नाही म्हणून चौकशी केली असता त्यांची आई मृत झाली हे समजतात शेजाऱ्यांनी धाव घेतली व त्यांच्या आईची अंत्यविधी केली.

त्यांची आई जिवंत असताना आपल्या आईसोबत त्या तिघही बहिणी लोकांची धुनी- भांडी करायला जात असायच्या त्यांना व्यवहारिक ज्ञान नसल्याने त्यांच्या प्रत्येक ठिकाणी त्यांच्यासोबत आईला जावं लागत असे. आणि आज अशा परिस्थितीत त्यांची आई त्यांना सोडून गेल्यामुळे त्यांची मानसिक स्थिती अजून खालवली आहे. त्या खूप घाबरल्या आहेत. दिवस-रात्र रडत देखील आहेत अशावेळी सदर तीनही बहिणी सामाजिक बांधिलकीच्या रूपा मुद्राळे हिने त्यांना मोलाचा आधार व साथ दिली आहे व सद्यस्थितीमध्ये त्या तिघही रूपा मुद्राळेयांच्या घरी सकाळपासून रात्रीपर्यंत बसून असतात अशा परिस्थितीमध्ये रूपा मुद्राळे त्यांचा सांभाळत करत आहे. कोरोना काळामध्ये देखील रूपा मुद्राळे हिने मोलाची कामगिरी बजवली होती. ज्या प्रेतांला कोणी हात लावत नव्हतं अशा प्रेतांना स्वतःमशानभूमीमध्ये नेऊन ती स्वतः अग्नी देत असे. तसेच रस्त्यावर कुणाचेही एक्सीडेंट होऊ देत कोणीही अडचणीमध्ये असू देत त्यांच्यासाठी ती नेहमीच देवदूता सारखी धावून जाते.

आज अशा अवस्थेमध्ये त्या तीनही बहिणीला तिने आधार देऊन एक माणुसकी जपली आहे. सामाजिक बांधिलकीच्या माध्यमातून संस्थेचे अध्यक्ष सतीश बागवे, उपाध्यक्ष शैलेश नाईक, सचिव समीरा खलील, कार्याध्यक्ष संजय पेडणेकर, रवी जाधव, सुजय सावंत, हेलन निबरे, श्याम हळदणकर, अशोक पेडणेकर, प्रसाद कोदे ,शरद पेडणेकर, शेखर सुभेदार, या सर्व सामाजिक बांधिलकीच्या कार्यकर्त्यांनी त्यांना मदतीचा हात दिलाच आहे परंतु आपणही पुढे येऊन त्यांना मदतीचा हात द्या असे नम्र आवाहन सामाजिक बांधणीच्या माध्यमातून करण्यात येत आहे. त्यांचा पत्ता आहे माजगाव ख्रिश्चनवाडी “देवाची महिमा” बिल्डिंगच्या मागे.

संपर्कासाठी:-

 रूपा मुद्राळे 9422633971

 रवी जाधव 9405264027


Spread the love

Related posts

शिवाजी चौक येथे भारतरत्न महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी

news

सावंतवाडीतील राजवाड्यात “प्रतापगडाचा रणसंग्राम” विषयावर व्याख्यान संपन्न..

news

आजचे राशीभविष्य [सोमवार दि. २७ फेब्रुवारी २०२३]

news

Leave a Comment