स्टोरी

बंटी माठेकर मित्र मंडळाकडून वन्य प्राण्यांना पिण्यासाठी पाण्याची व्यवस्था.

Spread the love

सावंतवाडी प्रतिनिधी: उन्हाळा सुरू झाला आहे वन्य प्राणी पाण्याच्या शोधामध्ये भर वस्तीमध्ये येत असल्याने लोकांच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो. याकरिता बंटी माठेकर मित्र मंडळाच्या माध्यमातून वन विभागाला वारंवार कल्पना देऊन देखील वन विभागाने याची अध्यापही दखल घेतली नाही. अखेर शेवटी वन्य प्राण्यांना पाणी मिळावं याकरिता मदारी रोड सासोलकर मैदान शेजारी या मित्र मंडळाने कृत्रिम पाण्याची तळी तयार केली आहे. याकरिता अमित सावंत, संजय नाईक, सचिन सासोलकर, बाळा सोनकर, बंटी माठेकर, प्रसाद जोशी व पाटकर यांनी यासाठी पुढाकार घेऊन वन्य प्राण्यांसाठी पाणी पिण्याची व्यवस्था केली आहे. अशाच प्रकारे वन विभागामार्फत देखील ठिकठिकाणी कृत्रिम पाण्याची तळी तयार करून वन्य प्राण्यांसाठी पाणी पाण्याची व्यवस्था करावी त्याचप्रमाणे भर वस्तीमध्ये वन्य प्राणी येऊ नये याकरिता देखील वन विभागाकडून लवकरात लवकर बंदोबस्त व्हावा अशी मागणी बंटी माठेकर मित्र मंडळाने केली आहे.


Spread the love

Related posts

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गालगत विदेशी झाडे लावण्यास पर्यावरणप्रेमींनी केला विरोध!

news

कष्टकरी ‘सुंदराआई’चा जागतिक महिलादिनानिमित्त सन्मान…!

news

सिंधुदुर्ग देवगड येथे अॅलहव रिले जातीचे महाकाय समुद्र कासव सापडले !

news

Leave a Comment